अहमदनगर : पंतप्रधान मातृवंदना योजना जिल्ह्यात लागू करण्यात आली असून, महिनाभरात जिल्ह्यातील साडेसहा हजार गरोदर मातांचे अर्ज योजनेच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आले आहे. राज्यात सर्वाधिक अर्ज नगर जिल्ह्यातून प्राप्त झाले असून, गरोदर मातांच्या बँक खात्यावर पाच हजार रुपये जमा होणार आहे. त्यामुळे गर्भावस्थेत बाळांची व मातांची काळजी घेण्यासाठी लागणा-या पैशांची चिंता मिटणार आहे.केंद्र शासनाच्या महिला व बालविकास मंत्रालयाने सुरू केलेल्या प्रधामंत्री मातृवंदना योजनेची राज्यात अमंलबजावणी करण्यात येत आहे. दारिद्य्ररेषेखालील व दारिद्र्य रेषेवरील अनेक महिलांना गर्भावस्थेत व प्रसुतीनंतरही मजूरी करावी लागते. परिणामी मातांसह बालकांचे कुपोषण होते. त्यामुळे माता-बालमृत्यूच्या घटना घडतात. त्यावर मात करण्यासाठी मातांना प्रत्येकी पाच हजार रुपयांचे अनुदान देण्याचे सरकारने जाहीर केले आहे.सरकारने ८ डिसेंबर रोजी योजना राबविण्याचा आदेश काढला. नववर्षात योजना सुरू करण्यात आली आहे. पहिल्या अपत्यासाठी ही योजना लागू आहे. गर्भधरणा ते प्रसूती व नंतर अशा तीन टप्प्यांत पाच हजार रुपयांचे आनुदांना मातांना मिळणार आहे. महिलांना या काळात काम न करता सकस आहार मिळावा, यासाठी सदर अनुदान वितरीत करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील ६ हजार ५०३ गरोदर मातांनी अर्ज दाखल केले असून, प्राथमिक अरोग्य केंद्रामार्फत ते मातृवंदना योजनेच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आले आहेत. त्यात दररोज वाढ होत असून, ही संख्या वाढण्याची शक्यता आरोग्य विभागाकडून व्यक्त करण्यात येत आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने त्यासाठी जिल्ह्यात जनजागृती अभियान हाती घेण्यात आले आहे.
नोकरदार वगळता सर्व मातांना लाभ
मातृवंदना योजनेचा लाभ दारिद्र्यरेषेखालील व दारिद्र्यरेषेवरील सर्व महिलांना मिळणार आहे. नोकरदरांना मात्र यातून वगळण्यात आले आहे. गर्भधारणा नोंदणीवेळी १ हजार रुपये, गरोदरपणाच्या सहाव्या महिन्यात २ हजार रुपये (तपासणी आवश्यक) आणि प्रसुतीनंतर बालकाची जन्मनोंद आणि तिसरा डोस पूर्ण झाल्यानंतर २ हजार रुपये अनुदान बँक खात्यात किंवा पोस्ट खात्यात जमा केले जाणार आहेत.
ही कादपत्रे आवश्यक
गरोदर मातांकडे स्वत: अधार कार्ड असणे बंधनकारकबँकेचे पासबुकची छायांकित प्रत आवश्यक