शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
2
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
3
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
4
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
5
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
6
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
7
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
8
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
9
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
10
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
11
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
12
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
13
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
14
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
15
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
16
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
17
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
18
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
19
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
20
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा

‘माउली’ला हवा आहे मदतीचा हात; लॉकडाऊनमुळे मदत थांबली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2020 3:09 PM

रस्त्यावर जगणा-या बेघर, बेवारस, मनोरुग्ण, अत्याचार पीडित व गंभीर आजारी असलेल्या माता-भगिनींना आयुष्यभरासाठी निवारा देत त्यांना नवजीवन देणा-या येथील माउली सेवा प्रतिष्ठानला लॉकडाऊनच्या काळात समाजातील देणगीदारांकडून मदतीचा हात हवा आहे. 

अहमदनगर : रस्त्यावर जगणा-या बेघर, बेवारस, मनोरुग्ण, अत्याचार पीडित व गंभीर आजारी असलेल्या माता-भगिनींना आयुष्यभरासाठी निवारा देत त्यांना नवजीवन देणा-या येथील माउली सेवा प्रतिष्ठानला लॉकडाऊनच्या काळात समाजातील देणगीदारांकडून मदतीचा हात हवा आहे. सामाजिक कार्यकर्ते डॉ. राजेंद्र धामणे व डॉ.सुचेता धामणे यांनी नगर-मनमाड महामार्गावर शिंगवे या गावाच्या परिसरात माउली सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू केलेल्या विविध प्रकल्पांमध्ये आज एकूण ३०२ माता-भगिनी व त्यांची येथेच जन्मलेली २८ बालके कायमस्वरूपी वास्तव्यास आहेत. माउलीमध्ये दाखल असलेल्या सर्व महिला या आयुष्यभरासाठी येथे राहतात. त्यांना त्यांच्या मानसिक व शारीरिक आजारामधून ब-या झाल्या तरी कुटुंबीय स्वीकारत नाहीत. त्यामुळे हेच त्यांचे कायमचे घर आहे. गेल्या दीड महिन्यांपासून मात्र कोरोना लॉकडाऊनमुळे माउलीच्या मनगाव प्रकल्पास भेट देणा-या देणगीदारांची संख्या अजिबातच नाही. त्यामुळे देणग्या किंवा अन्नधान्याची मदत पूर्णपणे बंद आहे. या संस्थेला कुठलेही सरकारी अनुदान नाही. सर्व कार्य फक्त देणगीदारांची मदतीवरच सुरु आहे. त्यामुळे दर महिन्याचा अन्न-धान्य व औषधांचा तब्बल साडेआठ लाख रुपयांचा खर्च भागविणे धामणे दांपत्यांना अत्यंत कठीण झाले आहे. येथील प्रत्येक महिलेस मानसिक आजारासोबत विविध शारीरिक आजारांसाठीही दररोज औषधे द्यावी लागतात. अतिदक्षता विभागातील वयस्क किंवा गंभीर रुग्ण महिलांना अधिक औषधे आणि काळजीची गरज असते. प्रकल्पातील महिला व मुलांना सध्या अन्नधान्य व औषधांची नितांत गरज असल्याचे डॉ.राजेंद्र धामणे व डॉ.सुचेता धामणे यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले.

माउली सेवा प्रतिष्ठानसाठी आजपर्यंत समाजातील विविध दानशूरांनी केलेल्या मदतीतून हा प्रकल्प उभा राहिला आणि आम्हाला काम करण्यास आणखी बळ मिळाले. सामाजिक अभिसरणाच्या प्रक्रियेत कायमच दुर्लक्षिल्या गेलेल्या समाजातील वंचित घटकांसाठी अधिकाधिक जोमाने आणि समर्पणाने काम करीत राहण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. सध्या अडचणीच्या काळात माउली सेवा प्रतिष्ठानमधील महिला आणि मुलांसाठी आपल्या मदतीची गरज आहे. माउलीच्या या कार्यासाठी मान्यवर देणगीदारांनी मदत करावी, असे आवाहन डॉ.राजेंद्र धामणे, डॉ.सुचेता धामणे यांनी केले आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरcorona virusकोरोना वायरस बातम्याSocialसामाजिक