अहमदनगर : शहरातील प्रलंबित विकास कामे पूर्ण करण्याचा मानस नव्या महापौर रोहिणी शेंडगे यांनी तर शहराला हरित नगर करण्याचा संकल्प नवे उपमहापौर गणेश भोसले यांनी व्यक्त केला आहे.
महापालिकेच्या नव्या महापौरपदी रोहिणी शेंडगे व उपमहापौरपदी गणेश भोसले यांची निवड झाली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना ही भावना व्यक्त केली. महापौर शेंडगे यांनी मुख्यमंत्रज्ञी उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेच्या सर्व नेत्यांचे, नगरसेवकांचे आभार मानले आहेत.
त्यांनी राष्ट्रवादीचे आमदार अरुणकाका जगताप आणि आमदार संग्राम जगताप यांचेही आभार मानले आहेत. उपमहापौर भोसले यांनीही दोन्ही आमदारांसह नगरसेवकांचे आभार व्यक्त करून शहरात विकासाची रखडलेली कामे मार्गी लावण्याचा मानस व्यक्त केला आहे. याशिवाय पाणी योजनेची कामे हाही भोसले यांच्या जीव्हाळ्याचा विषय आहे. तसेच महापालिकेतील अधिकाऱ्यांना शिस्तही लावणार असल्याचे त्यांनी सांगितले.