अहमदनगर : महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी शिवसेना- भाजपा एकत्र येत असल्याचे संकेत आहेत. दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांची नगरमध्ये युती स्थापन करण्यासाठी चर्चा सुरू असून, पक्षश्रेष्ठींच्या निर्णयाकडे स्थानिक नेत्यांचे लक्ष लागले आहे.महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी बहुमताच्या आकड्यापर्यंत एकही पक्ष पोहोचला नाही़ सर्वाधिक २४ जागा जिंकल्याने सेनेने सत्तेचा दावा ठोकला आहे़ शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड व दक्षिण जिल्हाप्रमुख प्रा़ शशिकांत गाडे यांची बैठक झाली़ भाजपाच्याही स्थानिक नेत्यांची युतीबाबत वरिष्ठ पातळीवर यासंदर्भात दोन्ही पक्षाच्या नेत्यांची चर्चा सुरू आहे.छिंदम छत्रपतींसमोर नतमस्तकछत्रपती शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने वादग्रस्त ठरलेला श्रीपाद छिंदम मंगळवारी छत्रपतींसमोर नतमस्तक झाला़ महापालिका निवडणुकीत विजय मिळाल्यानंतर छिंदम मंगळवारी नगरमध्ये दाखल झाला़ त्याने आपल्या कार्यालयात शिवाजी महाराजांसह डॉ़ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले़
नगरमध्ये महापौर शिवसेनेचाच होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2018 6:11 AM