साईअरिहंत पतसंस्थेच्या वतीने साईसंस्थानच्या कोविड रुग्णालयाला तीस वाफ घेण्याची यंत्रे व रुग्णांसाठी बिस्किटांचे चारशे पुडे भेट दिले. संस्थेचे अध्यक्ष सतीश गंगवाल व किशोर गंगवाल यांनी हे साहित्य साईबाबा रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. प्रीतम वडगावे यांच्याकडे सुपुर्द केले. येथील शांतिनाथ दिगंबर जैन मंदिरात झालेल्या या छोटेखानी कार्यक्रमाला संस्थेचे पदाधिकारी महेंद्र कोटस्थाने, संजय संकलेचा, ज्ञानेश्वर पवार, ललित गंगवाल, प्रतीक गंगवाल, सुमीत गंगवाल, सुभाष सेठी आदींची उपस्थिती होती.
याशिवाय सध्या असलेली रक्ताची टंचाई व कोविड उपचारासाठी आवश्यक असलेल्या प्लाझ्माच्या निर्मितीसाठी येथील श्री सकल जैन समाजाने भगवान महावीर जयंतीच्या निमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. साईबाबा संस्थानच्या रक्तपेढीच्या सहकार्याने आयोजित केलेल्या या शिबिरात जवळपास शंभरावर रक्त पिशव्यांचे संकलन झाले. शिबिरासाठी नरेश संपतलाल लोढा, महेश रतिलाल लोढा, कमलेश कांतिलाल लोढा, संजय सूरजमल लोढा, नीलेश अशोक गंगवाल, नचिकेत प्रदीप बाफना, राजेंद्र सूरजमल गंगवाल, अभिजित विजय संकलेचा, नरेश भारत सुराणा, प्रसाद जयंतीलाल जैन, योगेश भिकचंद ओस्तवाल, प्रतीक सतीष गंगवाल आदींनी विशेष पुढाकार घेतला.