कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत महत्त्वपूर्ण कामगिरी करणाऱ्या तालुक्यातील निमगाव जाळी प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी आणि रुग्णवाहिका चालक यांचा गुरुवारी (दि. २७) सन्मान करण्यात आला. जिल्हा परिषद सदस्य महेंद्र गोडगे, पंचायत समितीचे उपसभापती नवनाथ अरगडे, राजहंस दूध संघाच्या संचालिका प्रतिभा जोंधळे, उपसरपंच अनिल डेंगळे, तळेगाव सरपंच बाबासाहेब कांदळकर, विजय हिंगे, निमगाव जाळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी तय्यब तांबोळी, डॉ. राणी तांबोळी, मच्छिंद्र तांबे, सचिन दिघे, सोमनाथ जोंधळे, पंचायत समिती सदस्य स्वाती मोरे, माऊली डेंगळे, सोमनाथ खरात, प्रकाश वदक, प्रवीण जोंधळे, लहानू थोरात, कोंचीचे सरपंच सोमनाथ जोंधळे, नीलेश तांबे आदी यावेळी उपस्थित होते.
महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना सहा रुग्णवाहिका देण्यात आल्या आहेत. याचा फायदा ग्रामीण भागातील रुग्णांना वेळेवर उपचार मिळण्यासाठी होणार आहे, असेही संचालक थोरात म्हणाले.