शहरं
Join us  
Trending Stories
1
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
2
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
3
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
4
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
5
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
6
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
7
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
8
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
9
TATA IPL Auction 2025 Live: डेव्हिड वॉर्नर पुन्हा अनसोल्ड; हैदराबादला २०१६ मध्ये बनवलं होतं चॅम्पियन
10
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
11
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
12
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
13
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
14
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
15
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल
16
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
17
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
18
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात
19
IPL 2025 Auction : नेहरानं हेरला Jos Buttler चा चेहरा; GT च्या संघानं लगेच पर्समधून काढली एवढ्या कोटींची रक्कम

टँकर ठेकेदारांवर मेहेरनजर : ठोस कारवाईस जिल्हा प्रशासनाची टाळाटाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 11:59 AM

जिल्ह्यात सुरू असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या टँकरमध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता समोर आली आहे

अहमदनगर : जिल्ह्यात सुरू असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या टँकरमध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता समोर आली आहे. मात्र, ज्या दिवशी टँकर गावात गेलेला आढळला नाही तेवढ्या दिवसापुरती त्याच्या बिलात कपात करण्याची कारवाई केली जाईल, असे जिल्हा प्रशासनाचे म्हणणे आहे.नगर जिल्ह्यात आठशेहून अधिक टँकरने पाणीपुरवठा होत आहे. राज्यात टँकरमध्ये हा जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर आहे. मात्र ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये जिल्ह्यात टँकर पुरवठ्यात मोठी अनियमितता आढळून आली. अनेक टँकरमध्ये जीपीएस यंत्रणाच कार्यरत नव्हती. टँकरचे लॉगबुकही भरलेले नव्हते. टँकर उद्भवाऐवजी दुसºयाच ठिकाणी भरले जात होते, असे या तपासणीत आढळले. याशिवाय जीपीएस यंत्रणा कोणत्याच बीडीओ कक्षात आढळली नव्हती. ‘लोकमत’च्या वृत्तानंतर जीपीएस यंत्रणा कार्यरत करण्याचा प्रयत्न झाला.‘लोकमत’च्या स्टिंगनंतर प्रशासनाने पथके पाठवून तपासणी केली. त्यातही अनियमितता आढळून आली. मात्र, ज्या दिवशी अनियमितता आढळली तेवढ्या खेपांचे बिल न देण्याची जुजबी कारवाई प्रशासन करत आहे. टँकर पुरवठ्यात गंभीर त्रुटी आढळल्यास ठेकेदारांचा ठेका रद्द करण्याची तरतूद आहे. मात्र, अशी कडक पावले प्रशासनाकडून उचलली जाताना दिसत नाहीत.शासनानेही ‘आरटीओ’ यांना वगळलेटँकरच्या टाकीची वहन क्षमता ‘आरटीओ’ यांनी प्रमाणित करावी, असा शासन आदेश आहे. मात्र, नगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी शुद्धिपत्रक काढून हे अधिकार आरटीओ यांच्याऐवजी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाला दिले आहेत. आरटीओ यांना का डावलण्यात आले? असा प्रश्न ‘लोकमत’ने उपस्थित केला होता. त्यानंतर शासनाने २३ मे रोजी परिपत्रक काढून हे अधिकार पाणी पुरवठा अभियंत्यांनाच देण्याचे धोरण घेतले.शासनालाही ‘आरटीओ’ यांचे वावडे का आहे ? असा प्रश्न यामुळे उपस्थित झाला आहे. टँकरमध्ये प्रत्यक्षात किती पाणी वाहिले जाते? याबाबत संशयकल्लोळ आहे. दरम्यान ‘लोकमत’ने स्टिंग आॅपरेशनद्वारे ज्या त्रुटी निदर्शनास आणल्या त्यांचाही उल्लेख शासनाने परिपत्रकात केला आहे.गंभीर त्रुटी आढळल्या तरच ठेका रद्दखेपा न होण्यास सर्वस्वी टँकर चालकाला जबाबदार धरता येणार नाही. कधी उद्भवावर पाणी नसते. कधी वीज नसते. अशा कारणांमुळे खेपांत उशीर होऊ शकतो. गंभीर त्रुटी आढळल्या तरच ठेका रद्द करण्याची तरतूद आहे, अशी प्रतिक्रिया निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar collector officeअहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय