तनपुरे साखर कारखान्याने पंधरवडा पेमेंट २१०० रुपये शेतकऱ्यांच्या खात्यांवर वर्ग केले आहे. दुसरा पंधरवडा येत्या दोन दिवसांत वर्ग करण्यात येणार आहे. मागील वर्षाची एफआरपी रक्कम ११६ रुपये प्रतिटन हीदेखील चालू महिनाअखेर शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे.
राहुरी तालुक्यात फक्त अडीच लाख टन ऊस शिल्लक राहिलेला आहे. राहिलेला सर्व ऊस राहुरी कारखान्याला आला तरच शिल्लक दिवसांत चांगले गळीत होऊन जिल्हा सहकारी बँकेला मागील थकीत हप्ता जाईल. चालू गळीत हंगामात तयार होणाऱ्या प्रत्येक क्विंटल साखरेमागे पाचशे रुपये जिल्हा बँक भरून घेत आहे. त्यामुळे डॉ. सुजय विखे व संचालक मंडळ प्रयत्नांची पराकाष्टा करत आहे. तेव्हा तालुक्यातील सर्व सभासदांनी कारखाना वाचवायचा असेल तर आपला ऊस आपल्याच कारखान्याला द्या, असे आवाहन संचालक मंडळाने केले आहे.
....
बाहेरून टोळ्या आणण्याचे काम सुरू
तनपुरे सहकारी साखर कारखाना नियमितपणे सुरू झाला असून, बाहेरून टोळ्या आणण्याचे काम सुरू झाले आहे. यंदाचा गळीत हंगाम यशस्वी होण्यासाठी तनपुरे साखर कारखान्याला ऊस देऊन सहकार्य करावे.
-नामदेवराव ढोकणे, अध्यक्ष, तनपुरे सहकारी साखर कारखाना, राहुरी