अहमदनगर : भारत सरकारच्या नेहरू युवा केंद्र, जलशक्ती मंत्रालय, आधार बहुद्देशीय संस्था व जय असोसिएशन ऑफ एनजीओ (महाराष्ट्र राज्य) यांच्या संयुक्त विद्यमाने बोल्हेगाव फाटा येथील मारुतराव घुले पाटील महाविद्यालयात शनिवारी जलनियोजन संवर्धन, जतन, वापर कार्यशाळा झाली. या कार्यशाळेतून युवकांना जलबचतीचा संदेश देण्यात आला.
या कार्यशाळेचे उद्घाटन संध्या जोशी-पावसे यांच्या हस्ते झाले. यावेळी प्राचार्य डॉ. सुधाकर कुऱ्हाडे, काकासाहेब म्हस्के कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य एस. एस. बांगर, ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. भानुदास होले, जय असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. महेश शिंदे, पोपट बनकर, आधारवड संस्थेच्या अध्यक्षा अनिता दिघे, सुनील तोडकर, आरती शिंदे, नयना बनकर, डॉ. संतोष गिऱ्हे, डॉ. धीरज ससाणे, वैशाली कुलकर्णी आदींसह महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी युवक-युवतींसाठी जल व्यवस्थापनावर निबंध व पोस्टर स्पर्धा घेण्यात आली. तसेच जागतिक महिला दिनाच्या औचित्याने महाविद्यालयातील महिला शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचा पुस्तके देऊन सन्मान करण्यात आला. प्राचार्य एस. एस. बांगर यांनी पाणीबचतीवर विचार मांडले.
---फोटो- ०७ नेहरू युवा केंद्र
भारत सरकारच्या नेहरू युवा केंद्राच्या वतीने आयोजित जलनियोजन संवर्धन, जतन वापर कार्यशाळेचे उद्घाटन करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुधाकर कुऱ्हाडे. समवेत संध्या जोशी-पावसे, एस.एस. बांगर, भानुदास होले, महेश शिंदे, पोपट बनकर, अनिता दिघे.