बोटा : संगमनेर तालुक्यातील बोटा, माळवाडीलगतच्या गावांमध्ये शुक्रवारी (१४ आॅगस्ट) पहाटे व सकाळी ठराविक वेळेच्या अंतराने भूकंपाचे सौम्य धक्के बसले
बोटा, माळवाडी, केळेवाडी, आंबीदुमाला, कुरकुटवाडी परिसरात शुक्रवारी पहाटे तीन वाजल्यानंतर सकाळपर्यंत अंतराने हे भूगर्भातील हालचाली जाणवल्या. भूगर्भातून मोठा आवाज आल्याचेही जाणवले. यातील काही धक्क्यांची तीव्रता अधिक होती, असे माळवाडी पोलीस पाटील संजय जठार, विलास डावखर यांनी सांगितले.
दरम्यान, बोटा परिसरात शुक्रवारी पहाटेनंतर जाणवलेल्या भूकंपाच्या धक्क्यांची तीव्रता अत्यंत कमी होती. या घडामोडींच्या नोंदी नाशिक येथील भूकंपमापक यंत्रावर झाल्या नसल्याचे मेरी संस्थेच्या भूवैज्ञानिक चारूलता चौधरी यांनी सांगितले.
यापूर्वीही अनेकवेळा बोटा तसेच घारगाव येथे सौम्य भुकंपाचे धक्के जाणवले होते. याबाबत नाशिक येथील भूकंपमापक यंत्रावर नोंदी झालेल्या आहेत.