शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीत अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार काका-पुतण्या लढत; गडचिरोलीत वडील विरुद्ध मुलगी
2
महायुतीत २७८ जागांवर ठरले; आता १० जागांचाच तिढा! अमित शाहांसोबतच्या बैठकीत निर्णय
3
काँग्रेसने २५ विद्यमान आमदारांना पुन्हा दिली उमेदवारीची संधी; ४८ जणांची पहिली यादी जाहीर
4
एलओसीजवळ दहशतवादी हल्ला, दाेन जवान शहीद; जम्मूत पुन्हा भ्याड कृत्य; दाेन हमालही ठार
5
घड्याळ वापरा, पण अटही पाळा; अजित पवार गटाला सर्वोच्च न्यायालयाच्या कानपिचक्या
6
महायुती सरकारला धडा शिकविण्याची हीच खरी वेळ; विनेश फोगाट यांचा महायुतीवर घणाघात
7
सुधीर साळवींना उमेदवारी नाकारल्याने शिवडीत ठाकरे गटात नाराजी, राजीनामा देण्याची तयारी
8
जस्टीस संजीव खन्ना होणार देशाचे पुढील सरन्यायाधीश; 11 नोव्हेंबरला पदभार स्वीकारणार...
9
"...तर मी येवल्यातून भुजबळांविरोधात निवडणूक लढवेन", सुहास कांदेंना शिंदे-फडणवीसांचा मेसेज काय?
10
"त्यांचा इतिहासच गद्दारीचा, आईबापासोबतही..."; छगन भुजबळांचा कांदेंनी काढला इतिहास
11
गुलमर्गमध्ये लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला, 5 जवान जखमी तर एका साथीदाराचा मृत्यू
12
अयोध्येतील 55 घाटांवर 28 लाख दिव्यांची रोषणाई; झळाळून निघणार श्रीराम जन्मभूमी...
13
'भ्रष्टाचार, गुन्हेगारी वाढली', उमेदवारी मिळताच युगेंद्र पवारांनी काकाविरोधात थोपाटले दंड
14
'मविआ'त सांगोला मतदारसंघ कोणाला? जयंत पाटील म्हणाले, "एक-दोन दिवसात..."
15
ना हडपसर, ना खडकवासला...ठाकरे गटात प्रवेश केलेले वसंत मोरेंचा पुढचा प्लॅन ठरला
16
महायुतीचा २७८ जागांचा फॉर्मुला ठरला; देवेंद्र फडणवीसांनी काढला मविआला चिमटा
17
इम्तियाज जलीलांची वेगळीच खेळी; ३ विधानसभा मतदारसंघातून घेतले अर्ज, लोकसभाही लढणार
18
काँग्रेसची ४८ जणांची पहिली उमेदवार यादी जाहीर; अनेक बड्या नेत्यांचा समावेश 
19
NCP SP Candidate List : राष्ट्रवादी काँग्रेसची (शरद पवार) पहिली यादी जाहीर! कोणाची नावे?
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; भाजपामधून आलेल्या तिघांना शरद पवारांनी दिली उमेदवारी

दूध संघांकडून सरकारच्या आदेशाला केराची टोपली; जुलैमध्ये जुन्याच दराने दूध खरेदी 

By शिवाजी पवार | Published: July 19, 2024 3:28 PM

३० रूपये दर देण्यास संघांची टाळाटाळ 

श्रीरामपूर (जि. अहमदनगर) : राज्य सरकारने एक जुलैपासून दुधाला ३० रुपये लिटर दर तसेच पाच रुपये अनुदानाचे आदेश काढले. मात्र गुजरात स्थित दूध संघांनी नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून २७ रुपये लिटर दराने खरेदी सुरू ठेवल्याची माहिती समोर आली आहे. काही दूध संघांनी १ ते १५ जुलै दरम्यान दुधाची बिले अद्याप अदा केलेली नाहीत, तर काहींनी दुधाचे पैसे वर्ग केले असले तरी बिले मात्र दिले नाहीत. त्यामुळे सरकारच्या आदेशाला संघाकडून केराची टोपली दाखविली गेल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

दुधाचे दर कोसळल्यामुळे विशेष परिस्थितीत बाजारात हस्तक्षेप करत सरकारने अनुदान योजना सुरू केली. ५ जानेवारी २०२४ पासून प्रारंभी दोन महिन्यांसाठी शेतकऱ्यांना प्रति लिटर पाच रुपये अनुदान देण्याचा निर्णय झाला. २८ जूनपासून पुन्हा अनुदान देण्याची घोषणा करण्यात आली. सहकारी व खासगी दूध संघ या दोघांनीही योजना लागू करावयाची आहे. शेतकऱ्यांना ३.५ फॅट व ८.५ एसएमएस या गुणप्रतीसाठी किमान ३० रुपये दर बँक खात्यावर अदा करणे बंधनकारक आहे. त्यानंतर सरकारचे पाच रुपये अनुदान मिळते.

दरम्यान, श्रीरामपूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी गुजरात स्थित दूध संघाकडून २७ रुपये ८३ पैसे लिटर दराने पैसे बँक खात्यात वर्ग झाल्याची माहिती लोकमतला दिली. अन्य काही संघांकडून अद्याप जुलैच्या पंधरवड्याचे पैसे जमा झालेले नाहीत. ज्या संघांकडून पैसे मिळाले त्यांनी बिले दिलेली नाही. त्यामुळे सर्वच संशयास्पद सुरू आहे असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

जास्तीत जास्त शेतकऱ्यांना दूध अनुदान योजनेत समाविष्ट करण्याचा प्रयत्न आहे. शेतकऱ्यांना ३० रुपये दर तसेच पाच रुपये अनुदान एक जुलैपासून मिळेल. गिरीश सोनवणे,जिल्हा दुग्धविकास अधिकारी, नगर.सहकारी व खासगी दूध संघ जर सरकारच्या आदेशाप्रमाणे ३० रुपये लिटर दर देणार नसतील तर त्यांचे परवाने रद्द करावे. सरकारने दोषी दूध संघावर कारवाई करावी अशी आमची मागणी आहे. ऍड. अजित काळे, राज्य उपाध्यक्ष, शेतकरी संघटना

टॅग्स :milkदूधMilk Supplyदूध पुरवठा