शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
2
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
3
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
4
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
5
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
6
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
7
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
8
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
9
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
10
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
11
ऑफिसात डुलकी घेतली, म्हणून कंपनीनं नोकरीवरून काढलं; 'त्यांनी' असा बदला घेतला की, सर्वांनाच चकित केलं!
12
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
13
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
14
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
15
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
16
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
17
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या
18
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
19
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
20
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 

ठेकेदाराने खाल्ले लाखोंचे डांबर; नगर जिल्हा परिषदेतील प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2019 12:01 PM

जिल्हा परिषदेच्या रस्त्यांच्या कामांसाठी एकाच डांबराच्या चलनाचा वापर करुन २७४ मेट्रीक टन डांबराचा घोटाळा झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़. ठेकेदाराने ६५ लाखापेक्षा जास्त रुपयांची शासनाची फसवणूक केल्याचे चौकशी अहवालात म्हटले आहे़.

साहेबराव नरसाळे ।  अहमदनगर : जिल्हा परिषदेच्या रस्त्यांच्या कामांसाठी एकाच डांबराच्या चलनाचा वापर करुन २७४ मेट्रीक टन डांबराचा घोटाळा झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़. ठेकेदाराने ६५ लाखापेक्षा जास्त रुपयांची शासनाची फसवणूक केल्याचे चौकशी अहवालात म्हटले आहे़.औरंगाबाद येथील अशोक मुंडे यांनी नगर जिल्हा परिषदेचे नोंदणीकृत ठेकेदार जुनेद कलीम शेख यांच्याबाबत तक्रार केली होती़. शेख हे श्रीरामपूर येथील असून, जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम उत्तर विभागाच्या अखत्यारित येणा-या रस्त्यांच्या डांबरीकरणाच्या कामांचा ठेका त्यांना देण्यात आला होता़. याबाबत मुंडे यांच्या तक्रारीनंतर जिल्हा परिषदेने सार्वजनिक बांधकाम दक्षिण विभागाचे कार्यकारी अभियंता गावडे यांची चौकशी समिती नेमली होती़. त्यांनी चौकशी केल्यानंतर हा डांबर घोटाळा उघडकीस आला आहे़. या चौकशी अहवालात म्हटले आहे, जुनेद शेख यांनी जिल्हा परिषदेअंतर्गत केलेल्या डांबरी रस्त्यांच्या कामासाठी एकूण १७७़३२ मेट्रिक टन डांबर खरेदी केल्याचे दिसून येते़ तर त्यांनी केलेल्या कामांवर २२१़९६ मेट्रिक डांबराचा वापर केल्याचे दिसून येते़ तसेच सार्वजनिक बांधकामच्या संगमनेर विभागाअंतर्गत केलेल्या रस्त्याच्या कामासाठी ठेकेदार शेख यांनी नव्याने डांबर खरेदी केल्याचे दिसत नाही़. परंतु संगमनेरच्या कामांसाठी २२९़६५ मेट्रिक टन डांबर वापरल्याचे कागदोपत्री दिसत आहे़. त्यामुळे संगमनेर येथील कामातील २२९़६५ मेट्रीक टन व जिल्हा परिषदेच्या विविध रस्त्यांच्या कामांसाठी ४४़६४ मेट्रिक टन असे एकूण २७४़२९ मेट्रिक टनाची तफावत दिसून येते़ शेख यांनी विविध कामांमध्ये वारंवार एकाच डांबराच्या चलनाचा वापर करुन ६५ लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेचे शासनाचे नुकसान केले आहे़. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संगमनेर कार्यालयांतर्गत केलेल्या विविध कामांवर वापरलेल्या डांबराची चलने जिल्हा परिषदेच्या चौकशी समितीने मागविलेली होती़. हीच चलने जिल्हा परिषदेच्या कामांसाठी जोडण्यात आल्याचे दिसते. संगमनेर कार्यालयाकडे दिलेल्या एकूण ११ चलनांपैकी १० डांबराची चलने सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषद अशा दोन्ही ठिकाणी वापरल्याचे दिसून येते, असे अहवालात म्हटले आहे़. या चौकशी अहवालावरुन ठेकेदारावर गुन्हा दाखल करुन त्यांना काळ्या यादीत टाकावे, असा आदेश जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर यांनी दिला आहे.  याबाबत ठेकेदार शेख यांच्याशी त्यांच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला़ मात्र, त्यांनी प्रतिसाद दिला नाही़. औरंगाबाद येथील तक्रारदाराच्या तक्रारीवरुन ठेकेदाराची चौकशी लावण्यात आली होती़. या चौकशीचा अहवाल मी पाहिलेला नाही़. पण संबंधित ठेकेदाराकडून खुलासा मागवून पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अर्जुन आंधळे यांनी सांगितले.  

टॅग्स :zpजिल्हा परिषदAhmednagarअहमदनगर