शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
4
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
5
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
6
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
7
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
8
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
9
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
10
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
11
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
12
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
13
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
14
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
15
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
16
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
17
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
18
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
19
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
20
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय

...अन् महसूलमंत्री थोरातांनी गाडी थांबवून हटवले स्वत:चेच फलक; कार्यकर्त्यांसह नागरिकही अवाक्

By ऑनलाइन लोकमत | Published: January 01, 2021 8:08 PM

अधिकाऱ्यांना फ्लेक्ससाठी नियमावली तयार करण्याच्या सूचना

संगमनेर- महसूलमंत्री आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी आज संगमनेर दौऱ्यादरम्यान चक्क स्वतःचा फोटो असलेले नववर्षाच्या शुभेच्छांचे फ्लेक्स उतरवायला लावले. हौशी कार्यकर्त्यांनी लावलेले बॅनर थोरात यांनी गाडी थांबवून उतरवले. यावेळी त्यांनी प्रांताधिकारी, तहसीलदार, नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना बोलावून घेऊन फ्लेक्ससाठी नियमावली तयार करण्याच्या सूचना केल्या. संगमनेरमध्ये महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या पुढाकारातून भव्य बसस्थानक साकारले आहे. मात्र या बसस्थानकासमोर हौशी कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी केली जाते. त्यामुळे बसस्थानकाचं विद्रूपीकरण होतं. संगमनेरच्या दौऱ्यावर असलेले थोरात आज बसस्थानकासमोरून जात असताना त्यांच्या ही बाब लक्षात आली. विशेष म्हणजे तिथे असलेल्या बॅनरवर त्यांचेच फोटो होते. त्यांनी गाडी थांबवून त्यांच्या फोटोचे फ्लेक्स तात्काळ उतरवण्याच्या सूचना सोबत असलेल्या कार्यकर्त्यांना केल्या. त्यांच्या या कृतीनं काही क्षण त्यांच्या सोबत असलेले कार्यकर्तेही गोंधळले. मात्र थोरात यांनी आग्रह केल्यानं कार्यकर्त्यांनी फ्लेक्स उतरवले.थोरात यांचे कार्यकर्ते फ्लेक्स उतरवत असताना प्रमुख अधिकारी वर्ग तेथे पोहोचला. थोरात यांनी, बॅनर्स लावण्याच्या संदर्भात नियमावली तयार करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. बसस्थानक व्यवस्थापकांना बोलावून दंडात्मक कारवाई करण्यासही सुचवलं. याशिवाय बसस्थानकावरील अवैध व बेशिस्त पार्किंगला आळा घळण्यासाठीही ठोस पावले उचलण्याचे आदेश दिले. थोरात यांच्या या अनपेक्षित कृतीमुळे बसस्थानक परिसर अवैध बॅनर्समुक्त झाला आहे. समाजातील सर्वच स्तरांतून या कृतीचं कौतुक होत आहे.

टॅग्स :Balasaheb Thoratबाळासाहेब थोरात