संगमनेर : ‘दुश्मनी अच्छी नही मुझे दोस्त बनाकर देख’ असा शेर पेश करत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी कव्वालीच्या कार्यक्रमात रंगत वाढवली. येथील ख्वाजापीर मोहंम्मद सादीक दर्गाह ट्रस्टच्या उर्स कमिटीच्या वतीने आयोजित कव्वाली कार्यक्रमासाठी गुरुवारी ( दि.२२) रात्री ते संगमनेर शहरात आले होते. त्यांनी दर्ग्याचे दर्शन घेवून चादर अर्पण केली.
ट्रस्टचे अध्यक्ष, कार्याध्यक्ष निसार धांदल, उपाध्यक्ष निसार शेख, विश्वस्त जावेद जहागिरदार, कदीर शेख, हाजी फजलू रहेमान, शम्मू हाजी लाला बेपारी शरीफ शेख, रउफ शेख, एजाज देशमुख आदी यावेळी उपस्थित होते. महसूल मंत्री विखे पाटील यांनी ‘कभी खुद को मेरे प्यार मे भुलाकर देख’ ‘दुश्मनी अच्छी नही, मुझे दोस्त बनाकर देख’ हा शेर पेश करत कव्वाली कार्यक्रमाची रंगत वाढविली. खुमासदार शेरोशायरी चांगलीच चर्चा रंगली होती.
उद्योजक मनिष मालपाणी, सामाजिक कार्यकर्ते अमोल खताळ, भारतीय जनता पक्षाचे संगमनेर तालुकाध्यक्ष डॉ. अशोक इथापे, शहराध्यक्ष श्रीराम गणपुले, किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सतीश कानवडे, किशोर नावंदर, राहुल भोईर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी कव्वालीचा आनंद घेतला.