अहमदनगर : राज्याचे जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांनी मंगळवारी (११ आॅगस्ट) शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर मंत्री गडाख यांनी हातात शिवबंधन बांधून प्रवेश केला.
मंगळवारी दुपारी मंत्री गडाख यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेऊन शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी सेनेचे सचिव मिलींद नार्वेकर उपस्थित होते.
नगर शहरातील सेनेचे नेते, माजी मंत्री अनिल राठोड यांचे मागील आठवड्यात निधन झाले. त्यामुळे शिवसेनेत मोठी पोकळी निर्माण झाली आहे. यामुळे मुख्यमंत्री ठाकरे यांनी मंत्री गडाख यांच्यावर नगर जिल्ह्याची जबाबदारी सोपविली आहे. माझ्या सेना प्रवेशामुळे शेतकºयांचे तसेच शेतकºयांचे विविध प्रश्न मी अधिक जोमाने सोडवू शकेल, असे मंत्री गडाख यांंनी यावेळी सांगितले.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माजी खासदार यशवंतराव गडाख यांचेही अत्यंत सलोख्याचे संबंध होते. दुसºया पिढीतील दोन्ही सदस्य आता शिवबंधनात बांधले गेले आहेत. यामुळे भविष्यात नगरमधील राजकीय गणिते आणखी बदलणार आहेत.