अहमदनगर : महाराष्ट्र राज्याचे गृह (ग्रामीण), वित्त व नियोजन राज्यमंत्री दिपक केसरकर शुक्रवारी (दि.१६) अहमदनगर जिल्हा दौ-यावर येत असून शेवगाव गोळीबारात जखमी झालेल्या शेतक-यांची ते भेट घेणार आहेत. शुक्रवारी दुपारी २ वाजता राज्यमंत्री केसरकर येथील शासकीय विश्रामगृहात येतील. त्यानंतर ते दुपारी २.१५ वाजता मॅक्स केअर हॉस्पीटल येथे आंदोलनात जखमी झालेल्या शेतक-यांची विचारपूस करण्यासाठी भेट घेतील. त्यानंतर ते तेथून जिल्हा पोलिस कार्यालयात दुपारी ३ वाजता जिल्हा पोलिस अधीक्षक व संबधित अधिकारी यांच्यासमवेत चर्चा घटनेबाबत चर्चा करणार आहेत.
गृह राज्यमंत्री दिपक केसरकर घेणार गोळीबारातील जखमी शेतक-यांची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 1:20 PM