शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात तब्बल ७,९९५ उमेदवार, सर्वच पक्षांत बंडखोरही भारंभार, १०,९०५ उमेदवारी अर्ज दाखल
2
कॅनडात टेस्ला कारचा अपघातामुळे स्फोट; नाशिकचा युवक ठार, डीएनएवरून पटली ओळख 
3
अयोध्येत ५५ घाटांवर २८ लाख दिवे लागणार, ऐतिहासिक दीपोत्सवाचा मोठा उत्साह
4
आरडीएक्सने स्फोट करून रेल्वे स्थानक उडवून देण्याची धमकी, सुरक्षा यंत्रणेत खळबळ
5
इस्रायलच्या हल्ल्यात गाझामध्ये ६० जण ठार; मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचे प्रमाण अधिक
6
तीन वर्षांत बावनकुळेंच्या संपत्तीत ३९ टक्क्यांनी वाढ; नावावर एकही कार नाही
7
"वेळ बदलते, फार उशीर लागत नाही"; श्रीनिवास पवारांचे अजित पवारांच्या वर्मावर बोट
8
Smriti Mandhana चा शतकी तोरा; न्यूझीलंड विरुद्ध हरमनप्रीत ब्रिगेडनं दिमाखात जिंकली मालिका
9
महायुतीपाठोपाठ मविआचाही आकडा आला; पवारांना ८७, झगडणाऱ्या काँग्रेस-ठाकरेंना किती जागा?
10
ऑनलाइन बेटिंगशी संबंधित वेबसाइटवर ईडीचा छापा, करोडोंची मालमत्ता जप्त
11
AI'च्या मदतीने अखनूरमध्ये दहशतवाद्यांचा खात्मा; लष्कराने यशस्वी ऑपरेशननंतर खुलासा केला
12
नाना पटोलेंनी तिकिट विकलं; माजी आमदारानं गंभीर आरोप करत भरला अपक्ष उमेदवारी अर्ज
13
"आम्ही त्यांचा प्रचार करणार नाही"; मलिकांना उमेदवारी मिळाल्यानंतर भाजपची स्पष्ट भूमिका
14
हरिद्वारमध्ये ट्रेन उडवण्याचा कट; ट्रॅकवर आढळला डेटोनेट, संशयित तरुण ताब्यात
15
काँग्रेसने तिकीट दिलं, पण एबी फॉर्मच दिला नाही; दिलीप मानेंनी अपक्ष भरला अर्ज
16
IND vs NZ : भारताला भारतात पराभूत करणं शक्य आहे, हे आम्ही दाखवून दिलं - टीम साऊदी
17
हरयाणा निवडणुकीबाबत काँग्रेसचे आरोप फेटाळले, निवडणूक आयोगाने १६०० पानांचं दिलं उत्तर
18
अचानक Instagram डाऊन; मेसेज पाठवण्यात अडचणी, सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस...
19
महायुतीसमोर मताधिक्य राखण्याचे आव्हान, मविआची 'या' 11 मतदारसंघात काय होती स्थिती?
20
'दाऊदचा साथीदार फडणवीसांच्या जवळ..', मलिकांच्या उमेदवारीवरुन चतुर्वेदींची बोचरी टीका

मंत्र्यांचे जाकीट टाईटफिट, जनावरांना मात्र चारा नाही : संग्राम जगताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 2:14 PM

भाजप सरकारच्या काळात पशुधन धोक्यात आले आहे़ सरकार मात्र छावण्या सुरू केल्याचा देखावा करीत आहे़ राज्याचा कारभार चालविणाऱ्या मंत्र्यांचे जॅकेट टाईटफिट आहे, तर मुक्या जनावरांना मात्र मोजून चारा, असा सरकारचा अजब कारभार आहे,

जवळे : भाजप सरकारच्या काळात पशुधन धोक्यात आले आहे़ सरकार मात्र छावण्या सुरू केल्याचा देखावा करीत आहे़ राज्याचा कारभार चालविणाऱ्या मंत्र्यांचे जॅकेट टाईटफिट आहे, तर मुक्या जनावरांना मात्र मोजून चारा, असा सरकारचा अजब कारभार आहे, अशी टीका अहमदनगर लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार संग्राम जगताप यांनी पारनेर तालुक्यातील जवळे येथील सभेत केली.राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मंगलदास बांदल अध्यक्षस्थानी होते. यावेळी ज्येष्ठ नेते दादाकळमकर, जि. प. चे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे, निलेश लंके, ज्येष्ठ नेते मधुकर उचाळे, घनश्याम शेलार, माधवराव लामखडे, अशोक सावंत, दादासाहेब दरेकर, सुभाष लोंढे, सुवर्णा घाडगे, बबन रासकर, अंजना रासकर आदी उपस्थित होते़ जगताप यांनी यावेळी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला़ ते म्हणाले, पारनेर बालेकिल्ला असल्याचे काही जण सांगत आहेत़ या भागातील मतदारांच्या मतांवर वर्षानुवर्षे सत्ता भोगली़ मात्र या भागासाठी योगदान काय? निवडणुका आल्या की तालुक्यांचे दौरे करायचे़ या भागातील प्रश्न सोडवू, अशी आश्वासने द्यायची़ निवडणुका संपल्यानंतर पुढच्या निवडणुकीला त्यांना तालुक्याची आठवण येते़ विरोधकांची भूमिका मतलबी असून, अशा भूलथापा मारणाऱ्यांना थारा देऊ नका. पारनेर तालुका त्यांना चमत्कार दाखवेल, असे जगताप म्हणाले.मी दक्षिणेतील असल्याने विखेंनी विरोध केलाराष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष घनश्याम शेलार यांनी विखे यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, मी दक्षिणेतील रहिवासी असल्याने साई संस्थानच्या उपाध्यक्षपदाच्या निवडीत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी विरोध केला़ दक्षिणेला तेथे संधी दिली नाही. त्यांचे पुत्र आता दक्षिणेतून निवडणूक लढवित आहेत़ प्रवरानगरचे सुटाबुटातील अधिकारी, कर्मचारी प्रचाराला तुमच्याकडे येतील़ त्यांना फक्त एवढेच विचारा की, गेल्या चार- सहा महिन्यात तुमचे पगार झाले का? यंत्रणेचा भपका दाखविणारे कर्मचाऱ्यांचे पगार करतील का हे सांगावे?

टॅग्स :AhmednagarअहमदनगरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९ahmednagar-pcअहमदनगर