शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
2
आजचे राशीभविष्य : शुक्रवार 1 नोव्हेंबर 2024; आज अवैध कामांपासून दूर राहावे, क्रोध आणि वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
दिवाळी झटका! LPG सिलिंडरचा भाव वाढला, पटापट चेक करा दिल्ली ते मुंबईपर्यंतचे नवे दर
4
२४ तासांत १०० विमानांना बॉम्बची धमकी, एअर इंडियाच्या ३६, विस्ताराच्या ३५ फेऱ्यांवर परिणाम  
5
नेपाळी नोटेवरील नकाशात दाखवली तीन भारतीय क्षेत्रे, नोटा छापण्याचे कंत्राट दिले चिनी कंपनीला
6
मनोज जरांगेंचे ‘एमएमडी’ समीकरण; विधानसभा लढवण्याची घोषणा
7
मुंबईकरांना भुरळ लाइटवेट दागिन्यांची! धनत्रयोदशीला बाजारात २५० कोटींची उलाढाल
8
निवडणुकीतील गैरप्रकार थांबवा, अन्यथा कारवाई, मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचा इशारा
9
राज्यातील बेरोजगारीवर न बोलणारे हे कसले सरकार? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सवाल
10
पाकिस्तानसह जगभर दिवाळीची धूम, अमेरिकेत शाळांना सुट्टी
11
राज्यात आलेली सर्वाधिक परकीय गुंतवणूक फडणवीसांच्या नावावर
12
आयपीएल रिटेंशन : रोहित शर्मा मुंबईकडेच; माही केवळ ४ कोटींमध्ये खेळणार
13
समतोल ‘मन’ हेही ‘धन’; आज त्याची पूजा करू या!
14
मध्य रेल्वेने प्रवाशांना धरले वेठीस; ४ दिवस सुटीचे वेळापत्रक लागू
15
19 मिनिटांत 22 किलोमीटरचे अंतर पार अन् मिळाले जीवदान
16
खंडणीसाठी धमकावल्याप्रकरणी छोटा राजन टोळीचे ५ जण अटकेत
17
इस्रायली महिला फायटर्सचे इराणवर हल्ले!
18
११ वर्षीय पीडितेच्या गर्भपातास परवानगी; रक्त नमुना, टिश्यू जतन करण्याचे निर्देश 
19
‘राज’ की बात, भाजप अन् शिंदेंची अडचण!
20
दिवाळी, छटपूजेनिमित्त मध्य रेल्वेच्या ५८३ गाड्या

नगरच्या उड्डाणपुलाला संरक्षण मंत्रालयाचा हिरवा कंदील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2020 12:49 PM

नगर शहरातील बहुचर्चित उड्डाणपुलाचे काम सुरू करण्यास केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने परवानगी दिली असून, हे काम सुरू करण्यास राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने कार्यारंभ आदेश देण्याची आवश्यकता आहे. हा आदेश प्राप्त झाल्यानंतर प्रत्यक्षात कामाला सुरुवात होईल, अशी महिती खासदार डॉ़ सुजय विखे यांनी गुरुवारी दिली. 

अहमदनगर : नगर शहरातील बहुचर्चित उड्डाणपुलाचे काम सुरू करण्यास केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने परवानगी दिली असून, हे काम सुरू करण्यास राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने कार्यारंभ आदेश देण्याची आवश्यकता आहे. हा आदेश प्राप्त झाल्यानंतर प्रत्यक्षात कामाला सुरुवात होईल, अशी महिती खासदार डॉ़ सुजय विखे यांनी गुरुवारी दिली. 

शहरातील उड्डाणपुलाच्या कामाला केंद्रीय संरक्षण मंत्रालयाची परवानगी नव्हती. ही परवानगी मिळविण्यासाठी खासदार विखे यांनी मध्यंतरी केंद्रीय संरक्षण मंत्र्यांची भेट घेतली होती. तसेच शासनाकडे पाठपुरावा केल्याने याबाबत स्वतंत्र बैठक घेण्यात आली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, रस्ते व महामार्ग विकास मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीत नगर शहरातील उड्डाणपुलासाठी अनुकूल धोरण आखण्यात आले. 

या बैठकीत मंत्र्यांनी केलेल्या सुचनेनुसार संरक्षण मंत्रालयाकडून उड्डाणपुलाच्या कामास ना हरकत प्रमाणपत्र दिले आहे. या उड्डाणपुलामुळे नगर- औरंगाबाद  व नगर- पुणे या मार्गांवरील दळणवळण वाढून नगरच्या विकासास हातभार लागणार आहे. राष्ट्रीय हवाई मार्ग प्राधिकरणाकडून येत्या आॅगस्ट महिन्यात  प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल, असे विखे यांनी सांगितले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSujay Vikheसुजय विखे