केडगाव : निवडणुकीच्या प्रचारासाठी धार्मिक स्थळाचा वापर करीत त्या ठिकाणी केलेली भाषणबाजी माजी पोलिस उपअधीक्षकासह नवनिर्वाचित सरपंचाच्या चांगलीच अंगलट आली आहे. या दोघांसह एक विद्यमान ग्रामपंचायत सदस्य व पॅनलचा प्रचार प्रमुख अशा चौघाजणांवर एम.आय.डी.सी.पोलिस ठाण्यात आदर्श निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.नगर तालुक्यातील मजले चिंचोली गावात हा प्रकार घडला असून गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये निवृत्त पोलिस उपअधीक्षक यादवराव रभाजी आव्हाड, विद्यमान नवनिर्वाचित सरपंच अनिल उर्फ महेश पांडुरंग आव्हाड, नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य धर्मनाथ आनंदा आव्हाड, त्यांच्या पॅनलचे प्रचार प्रमुख किसन सावळेराम आव्हाड यांचा समावेश आहे. यांच्या विरोधात गावातील अविनाश भानुदास आव्हाड यांनी निवडणूक निर्णय अधिका-यांकडे तक्रार दाखल केली होती.
धार्मिक स्थळाचा गैरवापर : माजी पोलिस उपअधीक्षक, सरपंचासह चौघांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2019 4:31 PM