शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदेंनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा
2
Baba Siddiqui :"लॉरेन्स बिश्नोई गँगने मूर्ख बनवलं, दाऊदचा फोटो दाखवला अन्..."; आरोपीचा खळबळजनक खुलासा
3
मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब? दिल्लीत झाला निर्णय, सूत्रांची माहिती
4
भारतात रिअल इस्टेटमधील सर्वाधिक श्रीमंत उद्योजकांकडे किती संपत्ती?
5
हलगर्जीपणाचा कळस! प्रसूतीनंतर डॉक्टरांकडून पोटात राहिला 'टॉवेल'; महिलेला प्रचंड वेदना अन्....
6
Perfect Tea Recipe: टपरीवरचा फक्कड चहा बनवा घरच्या घरी; फक्त 'आलं' टाकताना करा 'हा' छोटासा बदल!
7
Vodafone Idea च्या शेअर्समध्ये १७% ची तेजी, सरकारच्या एका निर्णयामुळे गुंतवणूकदारांच्या उड्या
8
HDFC Life Insurance Data Leak : 'या' दिग्गज लाइफ इन्शुरन्स कंपनीचा डेटा लीक; तुम्ही तर नाही आहात ना पॉलिसी होल्डर?
9
रॅपर बादशाहच्या चंदीगढमधील नाईटक्लबमध्ये धमाका, मध्यरात्री दोन अज्ञातांनी घडवून आणला स्फोट
10
Utpanna Ekadashi 2024: उत्पत्ती एकादशीनिमित्त पापमुक्तीसाठी विष्णूपूजेत 'ही' फुले अवश्य अर्पण करा!
11
ए.आर.रहमानसोबत अफेअरच्या चर्चांवर मोहिनी डेने सोडलं मौन; म्हणाली- "मी त्यांना कायम..."
12
कामाची बातमी! पत्नीसह ज्वाइंट होम लोन घ्या, कमी व्याज, अधिक रक्कम; अनेक फायदे मिळतील
13
Chinmoy Krishna Das: बांगलादेशात चिन्मय कृष्णा दास यांना अटक, प्रकरण काय?
14
धक्कादायक! नर्स बनून आल्या अन् ब्लड टेस्टच्या बहाण्याने चोरलं बाळ; घटना सीसीटीव्हीत कैद
15
घडामोडींना वेग; एकनाथ शिंदेंच्या आजी-माजी खासदारांनी मोदींकडे मागितली भेटीची वेळ 
16
"बंदुका हिसकवा, पोलिसांना पळून जावू देवू नका’’, जमावातून दिली जात होती चिथावणी, संभल हिंसाचाराबाबतच्या FIRमधून धक्कादायक माहिती समोर   
17
पारंपरिक पद्धतीने होणार नागा चैतन्य-शोभिताचा लग्नसोहळा, तब्बल ८ तास चालणार सर्व विधी
18
बकिंगहॅम पॅलेसपेक्षाही मोठा महाल; जगातील सर्वात मोठं खासगी निवासस्थान, कोण आहेत राधिकाराजे गायकवाड?
19
मराठी येत नाही, माफी मागणार नाही, हिंदीत बोला; रेल्वे कर्मचाऱ्याने घातला वाद
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्री निवासस्थावरील एकनाथ शिंदेंच्या नावाची पाटी आधी काढली, पुन्हा लावली; चर्चांना उधाण

आमदार कर्डिले, जगताप, राठोड यांचे शस्त्रपरवाने रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2019 4:09 PM

विविध प्रकारचे गुन्हे दाखल असल्याने आमदार शिवाजी कर्डिले, आ. संग्राम जगताप, अनिल राठोड यांच्यासह सहाजणांचे शस्त्र परवाने रद्द करण्याचा आदेश गुरूवारी (दि. ७) जिल्हाधिकाऱ्यांनी काढला.

अहमदनगर : विविध प्रकारचे गुन्हे दाखल असल्याने आमदार शिवाजी कर्डिले, आ. संग्राम जगताप, अनिल राठोड यांच्यासह सहाजणांचे शस्त्र परवाने रद्द करण्याचा आदेश गुरूवारी (दि. ७) जिल्हाधिकाऱ्यांनी काढला.विविध गंभीर गुन्हे दाखल असतील तर अशा व्यक्तींचे शस्त्र परवाने रद्द करण्याची कारवाई कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने जिल्हाधिकाऱ्यांकडून केली जाते. त्याच अनुषंगाने भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले, राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप, शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड, राष्ट्रवादीचे दादाभाऊ कळमकर, शिवसेनेचे माजी नगरसेवक दिलीप सातपुते, माजी नगरसेवक सचिन जाधव या सहाजणांचे शस्त्र परवाने रद्द करून शस्त्रे जमा करावीत, असा प्रस्ताव जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे आला होता.केडगाव येथे वर्षभरापूर्वी झालेल्या शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांडात आमदार कर्डिले, जगताप यांच्यावर गुन्हा दाखल झाला. या घटनेनंतर केडगाव येथे दगडफेक केल्याच्या कारणावरून अनिल राठोड, दिलीप सातपुते, सचिन जाधव यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. पोलीस अधीक्षक कार्यालयावरील हल्लाप्रकरणी दादाभाऊ कळमकर आरोपी होते. याशिवाय या सर्वांवर आणखीही काही गुन्हे दाखल असल्याने प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून या सर्वांचे शस्त्र परवाने रद्द करण्याचा प्रस्ताव पोलिसांनी जिल्हाधिकाºयांना दिला होता. त्यावर अंतिम निर्णय घेऊन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी गुरूवारी (दि.७) या सहाजणांचे शस्त्र परवाने रद्द करण्याचा आदेश काढला.नुकत्याच झालेल्या महानगरपालिका निवडणुकीच्या कालावधीत जिल्हा प्रशासनाने गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या शहरातील सुमारे साडेपाचशे व्यक्तींवर हद्दपारीची कारवाई केली होती. आताही लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सुमारे पाच हजार उपद्रवी व्यक्तींची यादी पोलिसांनी तयार केली आहे. त्यांच्यावर तडिपारी किंवा इतर प्रतिबंधात्मक कारवाई होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर