अहमदनगर : नागरिकांना आरोग्याच्या सुविधा उपलब्ध होण्यासाठी शहरातील सर्व खासगी दवाखाने सुरू ठेवावेत. काही अडचण असल्यास डॉक्टर व नागरिकांनी आपल्याशी थेट संपर्क करावा. प्रशासनाशी चर्चा करून मार्ग काढला जाईल, असे आवाहन आमदार संग्राम जगताप यांनी नगकरांना केले आहे.शहरात कोरानाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे़ नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे, ही आपल्या सर्वांचीच जबाबदारी आहे. यासंदर्भात शहरातील डॉक्टरांशी आपण स्वत: संपर्क करत आहोत. खासगी डॉक्टरांनी ओपीडी सुरू ठेवून नागरिकांना सुविधा पुरवाव्यात. जेणे करून त्यांना थेट शासकीय रुग्णालयात जाण्याची गरज पडणार नाही. दवाखान्यांमध्ये स्टाफ उपलब्ध होत नाही, ही अडचण आहे. पण, त्यावर काय करता येईल, याचे नियोजन डॉक्टरांनी करावे. काही अडचणी येत असतील तर त्यांनी थेट आपल्याशी संपर्क साधावा. प्रशासनाशी चर्चा करून डॉक्टर व नागरिकांच्या अडचणी सोडविण्यात येतील. महापालिकेमार्फत पुरविल्या जाणा-या सेवांमध्ये खंड पडणार नाही, याची काळजी आयुक्तांसह सर्व विभागप्रमुखांनी घ्यावी, असे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
आमदार संग्राम जगताप म्हणतात....काही अडचण असल्यास थेट संपर्क करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2020 12:38 PM