शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
2
आजचे राशीभविष्य : आज अवैध कामांपासून दूर राहावे, क्रोध आणि वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
दिवाळी झटका! LPG सिलिंडरचा भाव वाढला, पटापट चेक करा दिल्ली ते मुंबईपर्यंतचे नवे दर
4
२४ तासांत १०० विमानांना बॉम्बची धमकी, एअर इंडियाच्या ३६, विस्ताराच्या ३५ फेऱ्यांवर परिणाम  
5
नेपाळी नोटेवरील नकाशात दाखवली तीन भारतीय क्षेत्रे, नोटा छापण्याचे कंत्राट दिले चिनी कंपनीला
6
मनोज जरांगेंचे ‘एमएमडी’ समीकरण; विधानसभा लढवण्याची घोषणा
7
मुंबईकरांना भुरळ लाइटवेट दागिन्यांची! धनत्रयोदशीला बाजारात २५० कोटींची उलाढाल
8
निवडणुकीतील गैरप्रकार थांबवा, अन्यथा कारवाई, मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचा इशारा
9
राज्यातील बेरोजगारीवर न बोलणारे हे कसले सरकार? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सवाल
10
पाकिस्तानसह जगभर दिवाळीची धूम, अमेरिकेत शाळांना सुट्टी
11
राज्यात आलेली सर्वाधिक परकीय गुंतवणूक फडणवीसांच्या नावावर
12
आयपीएल रिटेंशन : रोहित शर्मा मुंबईकडेच; माही केवळ ४ कोटींमध्ये खेळणार
13
राहुल गांधींचे महाराष्ट्रातील ‘गॅरंटी कार्ड’ही फ्लॉप होणार : देवेंद्र फडणवीस 
14
समतोल ‘मन’ हेही ‘धन’; आज त्याची पूजा करू या!
15
मध्य रेल्वेने प्रवाशांना धरले वेठीस; ४ दिवस सुटीचे वेळापत्रक लागू
16
19 मिनिटांत 22 किलोमीटरचे अंतर पार अन् मिळाले जीवदान
17
खंडणीसाठी धमकावल्याप्रकरणी छोटा राजन टोळीचे ५ जण अटकेत
18
इस्रायली महिला फायटर्सचे इराणवर हल्ले!
19
११ वर्षीय पीडितेच्या गर्भपातास परवानगी; रक्त नमुना, टिश्यू जतन करण्याचे निर्देश 
20
‘राज’ की बात, भाजप अन् शिंदेंची अडचण!

आमदार शिवाजी कर्डिले यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 4:09 PM

पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या तोडफोड प्रकरणी अटकेत असलेले भाजपाचे आमदार शिवाजी कर्डिले यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. पोलीस कोठडीची आज मुदत संपल्याने पोलीसांनी कर्डिले यांना न्यायालयात हजर केले होते.

अहमदनगर -  पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या तोडफोड प्रकरणी अटकेत असलेले भाजपाचे आमदार शिवाजी कर्डिले यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. पोलीस कोठडीची आज मुदत संपल्याने पोलीसांनी कर्डिले यांना न्यायालयात हजर केले होते. या सुनावणीअंती न्यायालयाने आमदार कर्डिले यांच्यासह इतर १७ जणांना न्यायालयीन कोठडी सुनावली तर याप्रकणात काल अटक केलेल्या चार आरोपींना १६ एप्रिलपर्यत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.याप्रकरणी पोलीसांनी लोकसेवकास पळवून नेणे. पोलीसांची विनंती धुडकावणे तसेच चिथावणी देण्याची  भादवि २२५, १५२ व १०९ ही कलमे वाढविले आहेत. 

पोलीस अधीक्षक कार्यालय तोडफोडप्रकरणी कर्डिले यांना सोमवारी(दि.८ एप्रिल) रोजी अटक झाली होती.  त्यानंतर मंगळवारी कर्डिले यांच्याविरोधात भा.द.वि.३०८ हे कलम (सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न करणे) वाढविण्यात आले होते. त्यामुळे कर्डिले यांच्या पोलीस कोठडीत वेळोवेळी वाढ करण्यात आली होती. आज पोलीस कोठडीची मुदत संपल्याने पोलीसांनी कर्डिले यांना पुन्हा न्यायालयात हजर केले होते. काल अटक केलेल्या काशिनाथ बबन शिंदे, मयुर कटारिया, सिध्दार्थ शेलार व संजू दिवटे यांना १६ एप्रिलपर्यत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.  

आमदार संग्राम जगताप यांना चौकशीसाठी शनिवारी रात्री पोलीस अधीक्षक कार्यालयात आणले असताना राष्ट्रवादी मोठ्या संख्येने कार्यकर्ते कार्यालयात दाखल झाले. या कार्यकर्त्यांनी पोलीस अधीक्षक कायार्लायवर दगडफेक करुन, कार्यालयाचे दरवाजे लाकडी दांडक्याने तोडून सार्वजनिक मालमत्तेचे नुकास करुन अनधिकृतरित्या कार्यालयात प्रवेश केला व बंदोबस्तासाठी असलेले पोलीस अधिकारी, कर्मचारी व महिला पोलीस कर्मचारी यांना शिवीगाळ करुन धक्काबुक्की करत सरकारी कामात अडथळा निर्माण केला होता. याप्रकरणी राष्ट्रवादी कॉग्रेसच्या अडीचशे ते तीनशे कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKedgoan double murderकेडगाव दुहेरी हत्याकांडShivaji Kardileyआ. शिवाजी कर्डिलेSangram Jagtapआ. संग्राम जगतापArun Jagtapआ. अरुण जगतापNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेना