शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
5
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
6
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
7
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
8
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
9
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
10
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
11
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
12
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
13
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
14
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
15
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
16
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
18
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
19
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
20
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे

रोजगार हमीच्या कामावर गेलेला आमदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2019 4:38 PM

१९६७ ते १९७२ या काळात आमदार म्हणून विधानसभेत कर्तृत्व गाजविणाºया कॉ़बी़ के ़ देशमुख यांना १९७२ निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला़  याच वर्षी राज्यात प्रचंड दुष्काळ पडला़ जनतेच्या हाताला काम अन् पोटाला भाकर नव्हती़ बी़ के़ यांची परिस्थितीही इतरांपेक्षा वेगळी नव्हती़ आपण आमदार होतो हे विसरून ते मुलाबाळांसह रोजगार हमीच्या कामावर दाखल झाले अन् कॉ़ बी़ के़ देशमुखांच्या नि:स्वार्थी सामाजिक कार्याचा अवघ्या महाराष्ट्राला परिचय झाला़

अहमदनगर : अकोले तालुक्यातील आदिवासी दुर्गम, केळूंगण या खेड्यात ४ मार्च १९२१ रोजी कॉ़ बी़ के देशमुख यांचा जन्म झाला़ कृष्णाजी दगडू देशमुख यांच्या चार अपत्यातील बी़ के़ सर्वांत लहान असल्याने त्यांना घरात सर्व जण लाडाने बारकू या नावानेच हाक मारत़ पुढे बारकूचा बापूराव अन् बी़ के़ देशमुख असे झाले़ गरिबीच्या वेदनेचे वेद आणि उपेक्षांची उपनिषदे यांच्या बरोबरीने बापूरावांच्या शिक्षणाला प्रारंभ झाला़ दररोज केळूंगण ते राजूर असा पायी प्रवास करत त्यांनी प्राथमिक शिक्षण कसेबसे पूर्ण केले़ शिक्षणाची पुढील वाटचाल खर्चिक होती कारण संगमनेरला जावे लागणार होते़ अखेर आईच्या अंगावर विकण्यासारखं जे किडूकमिडूक होतं ते विकून संगमनेरच्या पेटीट विद्यालयात  बापूराव दाखल झाले. पण संगमनेरला राहून शिक्षण पूर्ण करता येणार नाही आणि तो केविलवाणा प्रयत्न केला तर आहे तो जमिनजुमला सावकाराच्या घशात जाईल या भीतीने बापूराव यांनी शिक्षण अर्धवट अवस्थेत सोडलं. पण व्ह.फा. ची (व्हर्नाक्युलर फायनल) डिग्री हातात असल्याने त्यांनी १९५० साली व्हॉलंटरी शिक्षकाची नोकरी स्वीकारली. ही नोकरी म्हणजे बिनपगारी. लोक देतील त्यावर गुजराण करायची. या नोकरीने त्यांनाही बरेच काही शिकवलं. त्यातून आत्मविश्वास दृढावला. याच दरम्यान मान्हेरे येथील राघुजी गभाले यांच्या कन्या पार्वतीबाई यांच्याबरोबर लग्न झालं. कृषी सहाय्यक म्हणून अनेक ठिकाणी नोकºया केल्या. आयुष्यात स्थिर होण्याचा प्रयत्न चालू होता. पण योग्य पर्याय सापडत नव्हता़ कृषी सहाय्यक म्हणून नोकरी करत असतानाच संयुक्त महाराष्टÑाची चळवळ सुरू होती. महाराष्टÑभर आंदोलन पेटले होते. १९५६-५७ चा तो काळ. एस.एम. जोशी, कॉ.डांगे, दत्ता देशमुख, आचार्य अत्रे यांनी संपूर्ण महाराष्टÑ पिंजून काढला होता. मोरारजी सरकारविरुद्ध तरुणाई पेटून उठली होती. हे सारं बी.के. पहात होते, अनुभवित होते. आपणही त्यात सामील व्हावं म्हणून ते अस्वस्थ होत होते पण सरकारी नोकरीच्या बेड्यांनी  त्यांचे हात बांधले होते आणि नोकरी सोडणे ही गोष्ट परवडण्यासारखी नव्हती. पण काळजात सुई खुपसून घेतल्याशिवाय देवाच्या गळ्यातील हारात स्थान मिळवता येत नाही. पायाजवळच्या फुलांप्रमाणे किती दिवस निर्माल्य म्हणून जगायचं, आता वेळ आली आहे नोकरी सोडून आंदोलनात उतरायचं आणि अशा एका अवघड वळणावर बी.कें.नी आपल्या नोकरीचा राजीनामा देऊन टाकला आणि संयुक्त महाराष्टÑ समितीत ते सामील झाले. तालुक्यातील कॉ.बुवासाहेब नवले, कॉ.मुरली मास्तर नवले, कॉ.नबादादा मानकर, कॉ.सक्रूभाई मेंगाळ या एकनिष्ठांच्या सानिध्यात आले. किसान सभा आणि विडी कामगार युनियनच्या माध्यमातून त्यांचं नाव लवकरच जिल्हाभर झालं. ज्येष्ठ सहकाºयांच्या बरोबरीने कम्युनिस्ट पक्षाची बांधणी सुरू केली़ संयुक्त महाराष्टÑाची चळवळ ऐन भरात असतानाच १९५७ ची विधानसभा निवडणूक आली. संयुक्त महाराष्टÑ समितीच्या उमेदवारांना वातावरण अतिशय पोषक होते. बी.के. उभे राहिले तर हमखास आमदार होणार हे स्पष्ट दिसत होते. त्यांची उमेदवारीही कम्युनिस्ट पक्षाने निश्चित केली. पण ते नोकरीत आहेत त्यांचा दिलेला राजीनामा जाणीवपूर्वक सरकारने मंजूर न करता त्यांना निवडणुकीतून बाद ठरवण्यात आले आणि बी.के. आमदार होता होता राहिले. पण समितीचेच नारायण नवाळी निवडून आले.मुंबईसह संयुक्त महाराष्टÑाची निर्मिती झाली आणि समितीची उपयोगीताही संपली. त्याच दरम्यान १९६२ साली विधानसभेच्या निवडणुका आल्या. यशवंतराव चव्हाणांनी संयुक्त महाराष्टÑाचा मंगल कलश आणला अशी भावना संपूर्ण महाराष्टÑभर झाली होती. त्यामुळे काँग्रेसच्या बाजूने वातावरण अतिशय पोषक होते. १९६२ च्या निवडणुकीत या वातावरणाचा फायदा काँग्रेसला मिळाला आणि दहा वर्षे संयुक्त महाराष्टÑ समितीने लढूनही त्यांना पराभूत व्हावं लागलं. परिणामी बी.के. देखील १९६२ च्या निवडणुकीत पराभूत झाले. पण त्याच दरम्यान आलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत बी.के. भरघोस मतांनी निवडून आले आणि संयुक्त महाराष्टÑ निर्मितीनंतर तालुका पंचायत समितीचे पहिले सभापती झाले. तालुक्यातल्या कम्युनिस्ट चळवळीला मिळालेले हे पहिले मोठे यश होते. अर्थात ते मिळवण्यासाठी त्यांना तत्कालीन काँग्रेसी संस्कृतीबरोबर त्यांच्याच भाषेत मोठा संघर्ष देखील करावा लागला. सभापती झाल्यानंतर बी.केंनी कामाचा असा काही सपाटा लावला की, कम्युनिस्ट पक्षाची मजबूत पायाभरणी तालुक्यात झाली. काँग्रेसवाले त्यांना पेचात पकडण्याचा प्रयत्न करत होते आणि काँग्रेसने तशी संधी मिळवली देखील. एकाने मयत व्यक्तीचे नॅशनल सेव्हींग्ज सर्टिफिकेट आणले व त्यावर ओळख म्हणून बी.कें.ची सही घेतली. काँग्रेसवाल्यांनी प्रकरण कोर्टापर्यंत नेले. बी.कें.वर फसवणुकीचा दावा केला. त्यात १०० रुपये दंड झाला. बी.कें.चे स्नेही असलेले नबादादा मनकर यांच्या पत्नी लक्ष्मीबार्इंनी ती रक्कम भरली. पुढे ते प्रकरण अहमदनगर न्यायालयात गेले. तिथे बी.के. निर्दोष सुटले. पण अनावधानाने केलेल्या त्या सहीने त्यांना खूप त्रास मात्र झाला.१९६२ च्या निवडणुकीचा अनुभव गाठीशी असल्याने १९६७ च्या निवडणुकीत त्याची पुनरावृत्ती होणार नाही किंवा होऊ नये याची काळजी तालुक्यातील जनतेनेच घेतली. संयुक्त महाराष्टÑ निर्मितीचे श्रेय आणि त्यातून निर्माण झालेले वातावरण या जमेच्या बाबी काँग्रेससाठी १९६२ च्या निवडणुकीत होत्या. १९६७ पर्यंत ते वातावरण ओसरलं होतं. त्यामुळे ६७ ची निवडणूक काँग्रेससाठी सोपी नव्हती.बी.कें.च्या कम्युनिस्ट पक्षाकडे साधने नव्हती. त्यातून मतदारसंघ मोठा पण कार्यकर्त्यांकडे पक्षनिष्ठा होती. त्यामुळे स्वत:ची निवडणूक आहे असे समजून राजूरच्या हरिभाऊ देशमुख या हितचिंतकाने त्यांना जुनी जीप ६००० रुपयांना घेऊन दिली. म्हाळादेवी गावच्या ग्रामस्थांनी त्यांना नवीन कपडे दिले आणि त्यांच्या प्रचाराला प्रारंभ झाला़ गावोगावच्या लोकांनी वर्गणी गोळा करून बी.कें.ना निवडणूक निधी दिला. गोरगरीब आणि कष्टकºयांनी स्वत:चं काम बुडवून आपापल्या परीने त्यांना मदत केली आणि या लोकमताच्या जोरावर बी.के. आमदार झाले.१९६७ मध्ये बी.के. आमदार म्हणून विधानसभेत आले तेव्हा सभागृहात आदिवासी आमदारांची संख्या १६ होती. पण मंत्रिमंडळात एकही मंत्री आदिवासी नव्हता. २४ जुलै १९६९ च्या सभागृहातील एका भाषणात बी.कें.नी लोकसंख्येच्या प्रमाणात आदिवासींना मंत्रिमंडळात स्थान असले पाहिजे अशी पहिली मागणी केली. पन्नास वर्षांपूर्वीच्या काळात मागे वळून पाहिले तर बी.कें.नी त्याकाळात ज्या प्रश्नांना वाचा फोडली ते सारं विस्मयकारक आहे. त्यांच्या भाषणांना आचार्य अत्र्यांच्या ‘मराठा’ दैनिकात ठळकपणे प्रसिद्धी मिळे. अत्रेंनी एका ठिकाणी म्हटले आहे की, ‘शेवटच्या बाकावर बसून पुढच्यांना मागे पहावयास लावणारे व मागे टाकणारे असे त्यांचे वक्तव्य असे.’१६ मार्च १९६७ च्या सभागृहातील एका भाषणात बी.के. म्हणतात, लागवडी योग्य पडीत फॉरेस्ट जमिनी आदिवासी आणि भूमिहीनांना देण्यात याव्यात. तत्कालीन मंत्री राजारामबापू पाटील यांनी राजूरला येऊन तसे आश्वासन दिले होते. पण ते पाळले गेले नाही याची आठवणही ते सरकार व सभागृहाला करून देतात.१० मार्च १९६९ रोजी बी.कें.च्या ठरावानुसार सभागृहाने शासनाला शिफारस केली की, भूमिहीनांकडून कोणत्याही कारणासाठी जमिनी परत घेऊ नयेत. त्या त्यांना कायमच्या द्याव्यात. २७ नोव्हेंबर १९६९ रोजी मंत्र्यांच्या पगारवाढीचे विधेयक सभागृहात चर्चेसाठी आले असताना बी.के.आपल्या भाषणात म्हणाले, ‘ज्यांना रोजची आठ आणेही मजुरी पडत नाही, असे कोट्यवधी लोक देशात असताना आम्ही आपले स्वत:चे पगार वाढवून घ्यायचे, बहुमताच्या जोरावर ते वाढवून घेण्याचा प्रयत्न करायचा ही गोष्ट शासनाच्या समाजवादाच्या घोषणेला भूषणावह नाही.’’भंडारदरा धरण ते ओझर बंधारा हा प्रवरा नदीचा भाग ब्रिटिशांनी ‘नोटीफाईड भाग’ म्हणून घोषित केलेला होता. परिणामी संगमनेर व अकोले येथील शेतकºयांना प्रवरा पात्रातून पाणी उचलता येत नसे. पाणी उचलणे बेकायदेशीर ठरवले जाई. यावर मोठे आंदोलन बी.कें.नी उभारले. विधानसभेत इशारा दिला की, ‘बाभळेश्वर वीज केंद्र जाळून टाकू’ अखेरीस शासनाला नमते घेऊन हे पाणी उचलण्याची परवानगी द्यावी लागली. २१ नोव्हेंबर  १९६८ च्या भाषणात आदिवासींची स्थिती विशद करताना ‘‘अब्रू झाकण्यापुरता देखील कपडा त्यांच्या अंगावर नाही. या परिस्थितीत फरक पडणार नसेल तर आम्हाला वेगळा प्रांत द्या’’ अशी आक्रमक मागणी त्यांनी केली. वरील सर्व प्रश्नांचे स्वरुप आणि जाण बी.कें.ना किती खोलवर होती याची प्रचिती येते. पक्षनिष्ठा, मनमिळावू स्वभाव, निष्कलंक चारित्र्य साधी राहणी आणि निर्भयता यामुळे ते जनतेच्या गळ्यातील ताईत बनले. जे काही करायचं ते जनतेसाठी, स्वत:साठी नाही हे त्यांचं जीवनाचं साधं तत्त्वज्ञान होतं. १९७२ च्या निवडणुकीत पराभव पत्करावा लागला. त्याचवर्षी महाराष्टÑभर दुष्काळ पडला होता. घरची आर्थिक घडी विस्कटली होती़ आपण आमदार होतो हे विसरून बी़ के़ मुले आणि सुनांबरोबर रोजगार हमीच्या कामावर हजर झाले. त्यावेळच्या अनेक वर्तमानपत्रांच्या बातमीचा ते मथळा बनले होते.५० वर्षांपूर्वी विधानसभेत बी.के. यांनी मांडलेले प्रश्न आजही कायम आहेत़ हिरा ठेविता ऐरणी, वाचे मारीता जो घनीतुका म्हणे तोची संत, सोशी जगाचे आघात.सर्वसामान्यांची सेवा हेच आपले ध्येय आहे. हे तत्त्वज्ञान उराशी बाळगून प्रसंगी तब्येतीची कुठलीही पर्वा न करता सोसत राहिला आणि अवघ्या ६८ व्या वर्षी ५ फेब्रुवारी १९८९ रोजी त्यांनी राजूर येथे अखेरचा लाल सलाम केला. पण या एका बीजाच्या गाडून घेण्यातून अकोले तालुक्यात असंख्य प्रामाणिक कार्यकर्ते उदयास आले.

लेखक - प्रा. बी. एम. महाले

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर