पिंपळगाव पिसा तलाठी कार्यालयास आमदारांनी ठोकले टाळेआॅनलाईन लोकमतविसापूर, दि़७ - शेतकऱ्यांच्या संपाची धग अद्याप कायम आहे. पिंपळगावपिसा (ता.श्रीगोंदा) येथील तलाठी कार्यालयाला आमदार राहुल जगताप यांनी बुधवारी टाळे ठोकले. आ.जगताप म्हणाले, शेतकऱ्यांचा संप सुरु होऊन सात दिवस उलटूनही सरकारला जाग येत नाही.शेतकऱ्यांचे एवढे मोठे आंदोलन होण्याची ही पहिलीच वेळ आहे.बळीराजा अडचणीत असताना सरकार त्यांना केवळ आश्वासन देऊन संप मोडून काढण्याचा प्रयत्न करत आहे.यावेळी सरपंच सुमन मोरे, माजी सरपंच प्रमोद जगताप, सुर्यजित पवार, सुरेश भापकर, चंद्रकांत भापकर, विरेंद्र जगताप,अमर शेख व शेतकरी उपस्थित होते.
पिंपळगाव पिसा तलाठी कार्यालयास आमदारांनी ठोकले टाळे
By admin | Published: June 07, 2017 4:08 PM