रोहम म्हणाले, कोरोनामुळे सर्व अर्थव्यवस्था विस्कळीत झाली आणि शेतक-यांची पण हीच परिस्थिती आहेत. कोरोनाच्या कालावधीत लाईट बील वाढीव आले. त्यात शेतक-यांना, शेतमजुर, सर्वसामान्य नागरिकांना देखील अव्वाच्या सव्वा बिले दिल्यामुळे जगाचा पोशिंदा असलेल्या शेतक-यांना अनेक समस्यांना, संकटाला सामोरे जावे लागत आहे. थकीत वीज बिलापोटी महावितरणकडून कृषिपंपाचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम सुरू झाली आहे. गहू, हरभरा, ज्वारी ही रब्बी हंगामातील पिके जोमात असताना शेतकरी अडचणीत सापडत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची विज तोडणी थांबविण्यासाठी विद्यामान आमदारांनी पुढाकार घेण्याची गरज असताना देखील त्यांनी या विषयाकडे पाठ फिरवुन आपल्या नेहमीप्रमाणे फोटो सेशनमध्ये मग्न झाले आहेत. सत्ताधारी सरकारमध्ये राहुन शेतकऱ्यांचे प्रश्न सोडु शकत नाही, त्या सरकारचा काय उपयोग. दरम्यान, कोरोना महामारीमुळे गेल्या वर्षी लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. यामुळे संपूर्ण व्यवहार ठप्प झाले होते. संपूर्ण देशात शेती हा एकमेव व्यवसाय सुरू होता. कठीण काळात शेतकऱ्यांनी मेहनत घेऊन देशाला अन्नधान्याचा पुरवठा केला, हे राज्य सरकार विसरलेले आहे.
वीज तोडणीच्या संकटाकडे आमदारांचे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 4:20 AM