कुमशेत येथे कृषि विभाग, वन व आदिवासी प्रकल्प कार्यालय यांच्या समन्वयाने पर्यटन विभागाच्या मार्फत निसर्ग पर्यटन संधी व आव्हाने या विषयावर आयोजित विशेष परिसंवादाच्या निमित्ताने हडवळे बोलत होते.
या वेळी तालुका कृषि अधिकारी प्रवीण गोसावी, वन परीक्षेत्र अधिकारी दत्तात्रय पडवळे, प्रकल्प कार्यालयाचे बळीराम बरे, जी. एम. करवर, निसर्ग प्रेमी रमाकांत डेरे, मंडळ कृषि अधिकारी, गिरीश बिबवे, मनोज अस्वले, बालनाथ सोनवणे, बाळासाहेब बांबळे, शरद लोहकरे, संतोष साबळे व हरीचंद्रगड परिसर व मुळा खोरे परिसरात पर्यटनाचे काम करणारे आदिवासी युवक बांधव उपस्थित होते.
हडवळे म्हणाले, या भागातील पर्यटन मॉडेल विकसित करताना आपल्याला किमान दहा वर्षाचा आराखडा तयार करावा लागेल. सहकारी यांची संघभावना मजबूत केल्यास त्यातून टुरिझम नेटवर्क उभे राहील. सखोल व प्रभावी मार्गदर्शन करणारे, राहण्याची व्यवस्था पाहणारे, पारंपारिक आहार बनवनारे व होम स्टे बघणारे अशी फळी उभी करावी लागेल. पर्यटन संचालनालयाच्या माध्यमातून राज्याचे पर्यटन धोरण जास्तीत जास्त लोकाभिमुख करण्याचा प्रयत्न म्हणून पर्यटन प्रशिक्षकाच्या मार्फत राज्याचे पर्यटन धोरण लोकापर्यंत पोहोचवले जात आहे. वरवरचे पर्यटन करून तात्पुरता रोजगार मिळेल परंतु तो शाश्वत नाही, त्यातून आपल्याच जंगलची,परिसरची हानी होणार आहे. म्हणून आपला या विषयाकडे बघण्याचा दृष्टीकोण बदलावा लागेल.
प्रवीण गोसावी म्हणाले, शहरातील कोंडलेला वर्ग आता बाहेर येत आहे. तो शहरापेक्षा डोंगर, किल्ले, जंगल यांना महत्व देत आहे. यासाठी आपल्याला आपल्या भागाचा निसर्ग पर्यटनाचा परिपूर्ण आराखडा बनवून त्याची अंमलबजावणी करावी लागेल, त्यासाठी अशा समान उदेशासाठी एकत्र आलेल्या युवकांना आवश्यक ते प्रशिक्षण आत्मा मार्फत दिले जाईल.
यावेळी धामनवन, शिरपुंजे, आंबीत, पाचनई, खडकी येथील युवकांनी एकत्र येवून देवराई फाउंडेशनची स्थापना करून कुमशेत खोर्यातील जंगल व देवराई संवर्धित करण्याचा संकल्प केला.
कुमशेतचे सरपंच सयाजी आसवले यांनी प्रास्ताविक केले. गंगाराम धिंदळे यांनी आभार मानले.
१७हडवळे
कुमशेत येथील तरुणांना निसर्ग पर्यटना बाबत मार्गदर्शन करताना पर्यटन संचनालयाचे राज्य प्रशिक्षक मनोज हडवळे मार्गदर्शन करताना.