संसर्गाचे निदान करण्यासाठी
1) रॅपिड अँटिजन टेस्ट (आरएटी) सेन्सिटिव्हिटी ४० टक्के. तपासणी पॉझिटिव्ह असल्यास संसर्ग आहे. तपासणी निगेटिव्ह आल्यास व लक्षणे असल्यास आरटीपीसीआर करणे आवश्यक आहे.
2) आरटी- पीसीआर सेन्सिटिव्हिटी ९० टक्के. जास्त संवेदनशील तपासणी; परंतु रिपोर्ट येण्यास एक दिवसाचा अवधी लागू शकतो.
3) कोविड अँटीबॉडी टेस्ट :
या तपासणीमध्ये कोविड संसर्ग होऊन गेल्यानंतर /लसीकरण झाल्यानंतर प्रतिपिंडे किती तयार झाली ते मोजतात. लहान मुलांमधील "एमआयएस- सी" या आजाराचे निदान करण्यासही उपयोगी पडते.
कोविड संसर्गाची तीव्रता किती आहे हे सांगणाऱ्या तपासण्या
1) एचआरसीटी (छातीचा सिटी स्कॅन ) :
०-२५ स्कोअर यात दिला जातो. त्यावरून फुफ्फुसाचा किती भाग बाधित आहे हे समजते.
2) छातीचा एक्स-रे : लहान मुलांमध्ये एक्स-रे जास्त उपयोगी.
3) रक्तातील तपासण्या