अहमदनगर : संगमनेर शहरातील मोना प्लॉट आणि वाबळे वस्ती हा भाग कन्टेंनमेंट झोन तर कोल्हेवाडी रस्ता बफर झोन म्हणून जिल्हा प्रशासनाने जाहीर केला आहे. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी यासंदर्भात आदेश जारी केले आहेत. या भागात आजपासून ते १७ जून रोजीच्या मध्यरात्रीपर्यंत प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू करण्यात आल्या आहेत. तसेच कन्टेनमेंट झोन क्षेत्रातील सर्व अत्यावश्यक सेवा, इतर आस्थापना बंद राहणार असून नागरिकांच्या येण्या-जाण्यावरही प्रतिबंध करण्यात आला आहे.कंटमेंट झोन क्षेत्रातील सर्व आस्थापना, दुकाने, अत्यावश्यक सेवा, वस्तू विक्री सेवा व बफर झोन क्षेत्रातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना, दुकाने, वस्तू विक्री सेवा ४ जून २०२० सायंकाळी ५ वाजेपासून ते दिनांक १७ जून रोजी रात्री १२ वाजेपर्यंत बंद ठेवण्याबाबत आदेशात म्हटले आहे. ----------कंटमेंट झोनसंगमनेर शहरातील मोना प्लॉट व वाबळे वस्तीबफर झोन-कोल्हेवाडी रस्ता, ये-जा करण्यासाठी मार्ग- कोल्हेवाडी रस्ता पूल