-------------
लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : रिझर्व्ह बँकेने कोणत्याही नाण्यांवर बंदी घातली नसली तरी दहा रुपयांचे नाणे चलनातून बाद झाले आहेत. बँका व ग्राहक दहा रुपयांचे नाणे स्वीकारत नाहीत. हे प्रमाण ग्रामीण भागात सर्वाधिक असून, गैरसमजातून दहा रुपयांचे नाणे न स्वीकारण्याचे प्रमाण वाढले आहे.
चलनातील नाण्यांचे प्रमाण कमी होऊ लागले आहे. सध्या एक रुपया, दोन रुपये, पाच आणि दहा रुपयांचे नाणे चालनात वापरले जाते. असे असले तरी दहा रुपयांचे नाणे दुकानदार, बँका स्वीकारत नाहीत. दहा रुपयांचे नाणे चालत नसल्याने ग्राहकही हे नाणे घेत नाहीत. पाच रुपये असतील तर दहा रुपये नकाे, असे सांगून ग्राहक दहा रुपयांचे नाणे घेण्यास सपशेल नकार देतात. दहा रुपयांच्या नाण्यांबाबत नागरिकांमध्ये गैरसमज आहे. त्यामुळे दहा रुपयांचे नाणे एकप्रकारे चलनातून बाद झाल्याची परिस्थिती आहे.
......
पैसा असून अडचण
- दहा रुपयांचे नाणे दुकानात शिल्लक आहेत. परंतु, हे नाणे ग्राहक स्वीकारत नाहीत. यावरून काहीवेळा वादही होतात. त्यामुळे दहा रुपयांचे नाणे न ठेवलेले बरे. दहा रुपये देऊ केल्यास ग्राहक एक, दोन किंवा पाच रुपयांच्या नाण्यांची मागणी करतात.
- दुकानदार
.....
- दहा रुपयांची नोटच फक्त स्वीकारली जाते. दहा रुपयांचे नाणे कुणीही घेत नाही. त्यामुळे दुकानदारांकडून ते का स्वीकारायचे. हे नाणे घेतले तर ते द्यायचे कुणाला असाही प्रश्न आहे. पैसे असून काहीवेळेला अडचण होते.
- नागरिक
....
कुठल्याच नाण्यावर बंदी नाही
बँकेने कोणत्याही नाण्यांवर बंदी घातलेली नाही. तसा रिझर्व्ह बँकेचा आदेश नाही. नागरिकांमध्ये दहा रुपयांच्या नाण्यांबाबत गैरसमज असून, ग्राहक व दुकानदारांनी हे नाणे स्वीकारण्यात गैर काहीही नाही.
.....
कोणती नाणी नाकारतात
सध्या एक, दोन, पाच आणि दहा रुपये चलनात आहेत. परंतु, दहा रुपयांचे नाणे दुकानदार स्वीकारत नाहीत. त्यामुळे पैसे असून अडचण होत आहे. इतर नाणे चलनात आहेत. ते स्वीकारले जातात; पण दहा रुपयांचे नाणे स्वीकारले जात नसल्याचे सांगण्यात आले.
....
- रिझर्व्ह बँकेने दहा रुपयांच्या नाण्यांवर बंदी घातलेली नाही. दहा रुपयांच्या नाण्यांबाबत नागरिकांमध्ये गैरसमज असून, तो चुकीचा आहे. दहा रुपयांचे नाणे नाकारणे चुकीचे असून, बँका व ग्राहकांनी दहा रुपयांचे नाणे स्वीकारावेत.
- प्रकाश शेंडे, जिल्हाप्रबंधक, जिल्हा अग्रणी बँक, अहमदनगर
.....