राहुरी (जि. अहमदनगर) : मान्सून महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर आला आहे. १२ ते १५ जून या दरम्यान नगर जिल्ह्यात कधीही मान्सूनचे आगमन होईल, असा अंदाज शास्त्रज्ञ प्रा. रवींद्र आंधळे यांनी व्यक्त केला आहे. कर्नाटक ओलांडून मान्सून महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर असून १२ ते १५ जून दरम्यान अहमदनगर जिल्ह्यात पाऊस दाखल होण्याचा अंदाज आहे, अशी शक्यता राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ ग्रामीण कृषि मौसम सेवा विभागाचे सहयोगी प्राध्यापक रवींद्र आंधळे यांनी व्यक्त केली आहे. ११ जून रोजी अहमदनगर जिल्ह्यात हलक्या स्वरूपात पाऊस पडण्याची शक्यता आहे. १२, १३ आणि १४ जून रोजी जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल. हेच महाराष्ट्राच्या दृष्टीने मान्सूनचे आगमन असेल. हवामान ढगाळ राहणार हे. सध्या पेरणीयोग्य पाऊस झाला नाही, असे प्रा. आंधळे यांनी सांगितले. -----पेरणीसाठी शंभर मिलिमीटर पावसाची गरज आहे. नजीकच्या काळात पेरणीयोग्य पावसाची अपेक्षा आहे. सध्यातरी पेरणीयोग्य पाऊस नाही. त्यामुळे खरीप पेरणीची शेतकºयांनी घाई करू नये.-रवींद्र आंधळे, ग्रामीण कृषी मोसमी सेवा महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी
अहमदनगर जिल्ह्यात हलक्या स्वरूपात पाऊस, सोमवारपर्यंत होईल मान्सूनचे आगमन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2020 12:39 PM