अहमदनगर: जिल्ह्यात आज (१०आॅगस्ट)३८४ कोरोनाचेरुग्ण बरे होऊन घरी परतले. त्यामुळे आजपर्यंत ६ जार २५० रुग्ण बरे झाले आहेत. दरम्यान आज दुपारपर्यंत ४१ नवे कोरोनाच रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ६७.३४ झाली आहे.
नगर जिल्ह्यात सध्या २ हजार ९३१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये ४१ रुग्ण बाधित आढळून आले. बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा २३, संगमनेर १, राहाता १, नगर ग्रामीण १०, कँटोन्मेंट १, नेवासा २, शेवगाव १ आणि कोपरगाव २ अशा रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, आज एकूण ३८४ रुग्णांना घरी सोडण्यात आले. यामध्ये, मनपा १७२, संगमनेर २३, राहाता ३, पाथर्डी २७, नगर ग्रामीण १६, श्रीरामपूर १८, कॅन्टोन्मेंट १३, नेवासा २१, श्रीगोंदा १८, पारनेर १०, अकोले ४, शेवगाव १४, कोपरगाव ३९, जामखेड ५, मिलिटरी हॉस्पीटल १ अशा रुग्णांचा समावेश आहे.
आरापर्यंत नगर जिल्ह्यात कोरोनामुळे १०० जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण रुग्णसंख्या ९ हजार २८१ अशी झाली आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाढे यांनी दिली.