जामखेड : राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनानिमित्त कोविड काळात विशेष कार्य करणाऱ्या डॉ. स्नेहा मोरे व प्रिया कोठारी यांना सन्मानित करण्यात आले.
आमदार रोहित पवार यांच्या संपर्क कार्यालयासमोर ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी प्रा. मधुकर राळेभात, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी, तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे, सूर्यकांत मोरे, राजेंद्र गोरे, प्रा. राहुल अहिरे, बाबासाहेब मगर, शरद शिंदे, प्रकाश काळे, प्रा. राजेंद्र पवार, इस्माईल सय्यद, अमोल लोहकरे, दादा महाडीक, उमर कुरेशी, हरिभाऊ बेलेकर, सुरेश भोसले, मोहन पवार आदी उपस्थित होते.
सूर्यकांत मोरे यांची कन्या डाॅ. स्नेहा मोरे यांनी बीडीएसचे वैद्यकीय शिक्षण सुरू असतानाच जामखेड येथील डॉ. आरोळे कोविड सेंटर येथे तीन महिने विनामूल्य आरोग्य सेवा दिली. त्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी यांची कन्या प्रिया कोठारी यांनीही पुणे येथे सामाजिक संस्थेच्या माध्यमातून कोविड रूग्णांसाठी हॉस्पिटल सुरू करून आरोग्य सेवा केली. त्यांचाही सन्मान केला.
प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी म्हणाले, मागील दीड वर्षापासून कोरोना काळात शासनाने आरोग्यासाठी निधी खर्च केला तरीही आमदार रोहित पवार यांनी मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर निधी आणून विकासाची गंगा तालुक्यात आणली. अगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद या निवडणुकीत एकतर्फी वर्चस्व मिळविण्यासाठी सर्वांनी एकदिलाने काम करण्याची गरज व्यक्त केली. ज्येष्ठ नेते वैजिनाथ पोले यांनी आभार मानले.
---
१० जामखेड एनसीपी
जामखेड येथे राष्ट्रवादीचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रा. मधुकर राळेभात, दत्तात्रय वारे, सूर्यकांत मोरे, राजेंद्र कोठारी व इतर.