लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : महापालिकेने लसीकरणासाठी आठ केंद्र सुरू केले असून, केडगाव उपनगरात सर्वाधिक १२ हजार नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. सर्वात कमी लसीकरण मुकुंदनगरमध्ये झाले आहे.
महापालिकेला जिल्हा परिषदेकडून लस उपलब्ध करून दिली जात आहे. नगर शहराची लोकसंख्या सुमारे ५ लाख इतकी आहे. आत्तापर्यंत शहरासह उपनगरातील ८७ हजार ९०९ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. पहिला डोस घेणाऱ्या नागरिकांची संख्या ६० हजार ५०९ इतकी आहे. दुसरा डोस २७ हजार ४०० नागरिकांनी घेतला आहे. महापालिकेने लसीकरण करताना ४५ पेक्षा अधिक वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्य दिले आहे. नागिरक स्वत:हून लस घेण्यासाठी बाहेर पडत आहेत. महापालिकेच्या सातही आरोग्य केंद्रावर लस घेण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. लसीकरण मोहिमेत सुरुवातीला प्रभागनिहाय केंद्र सुरू करण्यात केले गेले. परंतु, त्यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. लस पळविण्याचे ही प्रकार घडले. लसीकरणात सुसूत्रता आणण्यासाठी मनपा आयुक्त शंकर गोरे यांनी सर्व उपकेंद्र बंद करण्याचा धाडशी निर्णय घेतला. आयुक्तांच्या या निर्णयाला नगरसेवकांकडून विरोध झाला. परंतु, आरोग्य केंद्रांवर पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध झाल्याने नगरसेवकांचा विरोध मावळला. लस घेण्यासाठी नागरिक प्रभागातील नगरसेवकांशी संपर्क साधत आहेत. लसीकरण वाढविण्याचा नगरसेवकांचा आग्रह आहे. परंतु, पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध होत नाही. त्यामुळे आरोग्य केंद्रांना प्रत्येकी २०० ते २५० डोस उपलब्ध होत आहेत. शहरात लसीकरणावरून आरोप- प्रत्यारोप झाले. परंतु, शहरातच कमी लसीकरण झाले असून, केडगाव उपनगरातील आरोग्य केंद्रात सर्वाधिक लसीकरण झाले आहे.
......
शहरातील सर्वाधिक लसीकरण झालेले केंद्र
केडगाव- १२ हजार ५९७
तोफखाना- ११ हजार १७९
जिजामाता आरोग्य केंद्र- ११ हजार ६६३
प्रोफेसर चौक- ११ हजार ५१
माळीवाडा- ११ हजार ६३६
.............
सर्वात कमी लसीकरण झालेले केंद्र
मुकुंदनगर- ८ हजार ६१४
नागापूर- ९ हजार ४४३
आयुर्वेद - ६ हजार ५९२
......................
शहरात २० टक्के लसीकरण
अहमदनगर शहराची लोकसंख्या सुमारे ५ लाख इतकी आहे. यापैकी ८७ हजार हजार ९०९ नागरिकांना लस देण्यात आली आहे. पहिला डोस ६० हजार ५०९ नागरिकांना देण्यात आला असून, दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या २७ हजार ४०० इतकी आहे.
.....
आरोग्य कर्मचारी
पहिला डोस- ९ हजार ८९७
दुसरा डोस- ४ हजार ४९४
.....
फ्रंटलाईन वर्कर
पहिला डोस- ९ हजार ७७७
दुसरा डोस- ३ हजार २३१
....
१८ ते ४५ वयोगट
पहिला डोस-१० हजार ७२४
दुसरा डोस- ४२?????????
.....
पहिला डोस- १८ हजार ३३४
दुसरा डोस- १२ हजार ९६३
....
लसीकरणात सुसूत्रता आणण्यासाठी उपकेंद्र बंद करण्यात आले असून, महापालिकेच्या आठ केंद्रांवर लसीकरण करण्यात येत आहे. शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करून दुसरा डोस सध्या दिला जात आहे.
- यशवंत डांगे, उपायुक्त, महापालिका
....
सूचना: डमी आहे. डमी क्रमांक- ८११