कर्जत : येथील रयत शिक्षण संस्थेच्या दादा पाटील महाविद्यालयातील एनसीसी पथकाने मेजर संजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सरकारी स्वच्छता पंधरवाड्यानिमित्त शनिवारी कर्जत ते करमाळा अशा राष्ट्रीय एकात्मता मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रॅलीत १०० मोटरसायकल मुले व मुलींनी सहभाग घेतला.
करमाळा येथील देवी येथील देवीच्या मंदिर परिसरात छात्रसैनिकांनी महास्वच्छता अभियान राबविले. त्याबद्दल मेजर संजय चौधरी यांचा सत्कार देवस्थानच्या प्रतिनिधी, समितीच्या सदस्यांनी केला. मोटारसायकल रॅलीला रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंगचे सदस्य राजेंद्र फाळके, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष काकासाहेब तापकीर, प्राचार्य बाळ कांबळे यांनी शुभेच्छा दिल्या. सैनिकांच्या रॅलीबद्दल जीवन झेंडे व कर्नल विनय बाली यांनी छात्र सैनिकांचे कौतुक केले. रॅली यशस्वीतेसाठी मेजर संजय चौधरी, प्रा. किसन सुळ यांनी विशेष परिश्रम घेतले.
...
१३कर्जत रॅली
....
ओळी-कर्जत येथील छात्रसैनिकांनी आयोजित केलेल्या कर्जत ते करमाळा या मोटारसायकल रॅलीचा प्रारंभ करताना राजेंद्र फाळके. समवेत प्राचार्य डॉ बाळ कांबळे, काकासाहेब तापकीर आदी.