शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
4
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
5
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
6
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
7
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
8
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
9
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
10
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
11
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
12
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
13
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
14
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
15
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
16
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
17
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
18
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
19
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
20
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'

नगरमध्ये मोटारसायकल चोर सुसाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 6:12 PM

नगर शहरात मोटारसायकल चोरांनी धुमाकूळ घातला आहे़ कोतवाली, तोफखाना आणि भिंगार कॅम्प पोलीस ठाणे हद्दीतून गेल्या पाच महिन्यांत ७३ मोटारसायकलची चोरी असून, यातील केवळ ९ गुन्हे उघडकिस आले आहेत.

ठळक मुद्देपाच महिन्यांत ७३ दुचाकींची चोरी: केवळ नऊ गुन्हे उघडकिस

अहमदनगर: नगर शहरात मोटारसायकल चोरांनी धुमाकूळ घातला आहे़ कोतवाली, तोफखाना आणि भिंगार कॅम्प पोलीस ठाणे हद्दीतून गेल्या पाच महिन्यांत ७३ मोटारसायकलची चोरी असून, यातील केवळ ९ गुन्हे उघडकिस आले आहेत.मोटारसायकल चोरांच्या टोळ्या पकडण्यात पोलीसांना मात्र अपयश येताना दिसत आहे. विविध शासकीय खासगी कार्यालयांसह इतर गर्दीच्या ठिकाणाहून मोटारसायकली चोरी होण्याचे प्रमाण वाढले आहे. या दुचाकी चोरांमध्ये नगर शहरासह जिल्ह्यातील बहुतांशी टोळ्या कार्यरत आहेत. बहुतांशी जणांच्या मोटारसायकलला केवळ हॅडेल लॉक असतो. हा लॉक काही क्षणात तोडून बनावट चावी लावून दुचाकी पळविली जाते. जिल्हा न्यायालयाच्या आवारातूनही दुचाकी चोरी होण्याच्या घटना घडल्या आहेत. दुचाकी चोरणाऱ्यांमध्ये तरूणांसह अल्पवयीन मुलांचेही प्रमाण जास्त आहे. व्यसन आणि एैयाशीसाठी तरूण मुले वाहन चोरीचा गुन्हा करत असल्याचे समोर आले आहे. चोरलेल्या मोटारसायकली भंगारात अथवा एखाद्या ग्राहकाला कमी किमतीत विकल्या जातात. चोरी जाण्याच्या भितीमुळे बहुतांशी जणांनी मोटारसायकलच्या पुढील चाकाला लॉक बसवून घेतला आहे.२६७ चोरी ३३ उडघकिसनगर शहरातील तीन पोलीस ठाणे हद्दीत २०१७ या वर्षात २६७ मोटारसायकली चोरीला गेल्या आहेत. यातील केवळ ३३ गुन्हे उघडकिस आले आहेत. शहरात होणारी चैनस्रॅचिंगच्या घटना कमी झाल्या असल्या तरी दुचाकी चोरांच्या टोळ्यांना पकडणे पोलीसांसमोर आव्हान निर्माण झाले आहे.पोलीस ठाणे निहाय मोटारसायकलींची चोरी (मागील पाच महिने)भिंगार कॅम्प १४तोफखाना २२कोतवाली ३७दुचाकी चोरांना शोध्याचे काम सुरू आहे़ मागील आठवड्यात तोफखाना पोलीसांनी काही दुचाकी चोरांना अटक केली. आपली दुचाकी चोरी जाऊ नये म्हणून नागरिकांनाही दक्षता घ्यावी.डॉ. अक्षय शिंदे, सहाय्यक पोलीस अधीक्षक

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar policeअहमदनगर पोलीस