बुधवारी (दि.०२) संगमनेर तालुक्यातील सावरगाव तळ गावाला दिलेल्या भेटीप्रसंगी ते बोलत होते. पाणी फाउंडेशनचे जिल्हा समनव्यक विक्रम फाटक, तालुका समन्वय भैरवनाथ अडलिंग, राजेंद्र जाधव, डॉ. शंकर गाडे, पोलीस पाटील गोरक्ष नेहे, संतोष फापाळे, रामदास डोंगरे, गंगाराम ढोले, चांगदेव दरेकर, चैतन्य कासार, रवी नेहे, अजित फापाळे, हरीश नेहे, अरुण फापाळे, संदीप थिटमे, अशोक थिटमे, अविनाश नेहे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
डॉ. पोळ म्हणाले, कृषी क्षेत्रातील विविध प्रयोग, जलसंधारण व वृक्षसंवर्धन, एकत्र कुटुंब पद्धती, दुग्ध व्यवसाय, अस्थी विसर्जनातून पर्यावरण रक्षण, वृक्षारोपणाचा नावीन्यपूर्ण उपक्रम यासारखे विविध दिशादर्शक उपक्रम सावरगाव तळने राज्याला दिले असून सावरगाव तळच्या उपक्रमाचे व शेती प्रयोगांचे अनुकरण केल्यास गावे समृद्ध होण्यासाठी वेळ लागणार नाही. प्रत्येक गावाने पाण्याचे व्यवस्थापन करणे गरजेचे असून, शेतीतील उत्पादन खर्च कमी करण्यासाठी आणि शाश्वत शेतीसाठी मातीचा सेंद्रिय कर्ब संभाळने हे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी रासायनिक खते औषधे कमी करून जास्तीत जास्त सेंद्रिय पद्धतीने शेती करणे आवश्यक आहे तरच ते शक्य आहे. गावच्या समृद्धीसाठी गावाला चांगले नेतृत्व असणे गरजेचे आहे.