अहमदनगर : वनरक्षक, वनपाल यांच्या वेतनश्रेणीत सुधारणा करावी, जुनी पेन्शन योजना लागू करावी, अशी विविध मागण्यांसाठी येथील उपवनसंरक्षक कार्यालयासमोर महाराष्ट्र वनरक्षक, वनपाल संघटनेच्यावतीने सोमवारी धरणे आंदोलन करण्यात आले.निवासी उपजिल्हधिकारी संदीप निचित यांनी वन कर्मचा-यांच्या विविध मागण्यांचे निवेदन स्वीकारले. वनरक्षक, वनपाल कर्मचा-यांना कुटूंब आरोग्य योजना लागू करणे, वनपाल यांना कायम प्रवास भत्ता वाढवून मिळावा, पोलीस विभागाप्रमाणे प्रोत्साहन भत्ता, अतिकालिक भत्ता, आहार भत्ता लागू करावा, ११ दिवसांच्या संपकाळातील अर्जित रजा मंजूर करुन वेतन मिळावे, वन व वन्यजीव संरक्षणादरम्यान मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास नुकसान भरपाई व आर्थिक मदत मिळावी, मयत कर्मचा-यांच्या पाल्यांना त्वरीत अनुकंपा तत्वाावर नोकरी मिळावी, वन्य जीव विभागातील क्षेत्रीय कर्मचा-यांना विशेष भत्ता मिळावा, अशा विविध मागण्या वन कर्मचाºयांनी केल्या आहेत. या मागण्यांसाठी वन कर्मचा-यांनी सोमवारी धरणे आंदोलन केले.
नगरमध्ये वन कर्मचा-यांचे धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 2:47 PM