श्रीरामपूर : तालुक्यातील निपाणी वडगाव येथील खासदार गोविंदराव आदिक ग्रामीण शिक्षण संस्थेच्या सेवक पतसंस्थेने सभासदांना १२.५० टक्के लाभांश व व्याजावर ३.५० टक्के रिबिट देणार असल्याची माहिती अध्यक्ष रवींद्र थोरात यांनी दिली. पतसंस्थेची वार्षिक सभा संस्थेचे सरचिटणीस अविनाश आदिक यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यालयात ऑनलाइन पार पडली. यावेळी ही घोषणा करण्यात आली.
प्रारंभी आदिक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. पतसंस्थेला २ लाख २८ हजार रुपये नफा झाला असून, संस्थेचे रौप्य महोत्सवी वर्ष असल्याने सभासदांना आर्थिक फायदा देण्याचा प्रयत्न आहे, असे थोरात यांनी नमूद केले.
यावेळी संस्था अध्यक्ष प्रा. डॉ. बबनराव आदिक, संस्था सहसचिव ॲड. जयंत चौधरी यांनी संस्थेचे कार्य प्रगतिपथावर असल्याचे सांगितले. सूत्रसंचालन शंकरराव शैलमकर यांनी केले, तर अहवाल वाचन व्यवस्थापक संतोष दांडगे यांनी केले.
भास्करराव ताके, के. के. उंडे, गोपीनाथ वमने, नाईक, रमेश वलटे, बबनराव लबडे, विजय गायकवाड, संभाजी जाधव उपस्थित होते.
-------------