अहमदनगर : सामाजिक क्षेत्रात दिशादर्शक काम केल्याबद्दल सी.एस.आर. नियतकालिक यांच्या वतीनं अहमदनगरचे खासदार डॉ. सुजय विखे यांना ‘युथ आयकॉन’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.दिल्ली येथील विज्ञान भवनात केंद्रिय अन्न व प्रक्रिया मंत्री हसमीरत कौर बादल यांच्या हस्ते डॉ.सुजय विखे यांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी सी.एस.आर. नियतकालिकाचे मुख्य संपादक अमित उपाध्यये उपस्थित होते.देशातील सामाजिक व पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रतिष्ठेचा हा पुरस्कार मानला जातो. डॉ.सुजय विखे यांनी अहमदनगर जिल्ह्यातील ३५ आरोग्य शिबीराच्या माध्यमातून ७० हजार पेक्षा जास्त रुग्णांची सुश्रुषा केल्याची दखल घेण्यात आली. जनसेवा फौंडेशनच्या माध्यमातून २०८ आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या कुटुबियांना दत्तक घेऊन त्यांच्या मुलांच्या उच्चशिक्षणांची व्यवस्थाही खासदार विखे यांनी केली.‘‘ राष्ट्रीय स्तरावरचा हा पुरस्कार स्वीकारताना आनंद होत असून ग्रामीण भागातील काम करणा-या युवकांना प्रोत्साहित करण्याची मोठी जबाबदारी आपल्यावर आली आहे. ग्रामीण भागात काम करण्यास आणखी प्रोत्साहन मिळाले असल्याचं’’ खासदार डॉ.सुजय विखे यांनी सांगितलं.
खासदार डॉ. सुजय विखे यांचा ‘युथ आयकॉन’ पुरस्कारानं सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2019 4:23 PM