अण्णा नवथर, लोकमत न्यूज नेटवर्क, अहमदनगर: बिगर शेती क्षेत्राचा स्वतंत्र सातबारा तयार करून देण्यासाठी चिखली ( ता. संगमनेर) येथील तलाठ्याच्या सांगण्यावरून त्याच्या साथीदाराला लाच घेताना नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. धनराज रणसिंग राठोड (वय ४०, सजा चिखली, ता. संगमनेर) असे लाज मागणाऱ्या तलाठ्याचे नाव असून त्याच्या सांगण्यावरून योगेश विठ्ठल काशीद (३३, रा. घुलेवाडी फाटा ता. संगमनेर)असे लाज घेणाऱ्याचे नाव आहे.
तक्रारदार यांचे वडिल व इतर ११जणाचे नावे मंगळापुर येथे असलेले बिगर शेती क्षेत्राचा स्वतंत्र सातबारा उतारा तयार करून देण्याचे मोबदल्यात तलाठी राठोड यांनी 40 हजार रुपयांची मागणी केली. तडजोडीअंती 36 हजार रुपये देण्याचे ठरले. दरम्यान तक्रारदार यांनी नाशिक येथील प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. नाशिक येथील पथकाने सापळा लावून तलाठी राठोड याच्या साथीदारास 36 हजार रुपयांची लाज घेताना रंगेहात पकडले. ही कारवाई नाशिक येथील लातूर प्रतिबंधक विभागाच्या पोलीस निरीक्षक गायत्री जाधव यांच्या पथकाने केली.