राहुरी : अहमदनगर ज्जिल्ह्यातील सर्वात मोठ्या असलेल्या मुळा धरणातून आज सायंकाळी ५ वाजता ११ मो-याद्वारे ४ हजार क्युसेकने पाणी सोडण्यात आले. आमदार शिवाजी कर्डिले यांनी कळ दाबल्यानंतर मुळा धरणातून जायकवाडीकडे पाणी झेपावले.२६ टीएमसी क्षमता असलेल्या मुळा तांत्रिकदृष्ट्या भरले आहे. त्यामुळे आज सायंकाळी ५ वाजता धरणातून जायकवाडी धरणाकडे पाणी सोडण्यात आले. पाटबंधारे खात्याने नदीकाठी राहणा-या लोकांना सावधानतेचा इशारा दिला आहे.धरणातून ११ मो-यातून पाणी सोडण्यात आले आहे. पाटबंधारे खाते पाण्याच्या पातळीकडे लक्ष ठेऊन असल्याचे मुळा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता रावसाहेब मोरे यांनी सांगितले.
मुळा धरण ओव्हरफ्लो : जायकवाडीकडे पाणी झेपावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2019 5:52 PM