: राजकारणात लागणारी जिद्द, आत्मविश्वास, संयम लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्यात होता. त्यांनी अन्यायाविरूध्द उभे राहुन संघर्ष केला, असे मत नगराध्यक्षा ममता पिपाडा यांनी लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीप्रसंगी व्यक्त केले. यावेळी डॉ.राजेंद्र पिपाडा, दशरथ तुपे उपस्थित होते. नगराध्यक्षा ममता पिपाडा यांनी निवासस्थानी लोकनेते गोपिनाथ मुंडे यांची जयंती साजरी केली.
पिपाडा म्हणाल्या, गोपीनाथ मुंडे भारतीय जनता पक्षाचा चेहरा होते. महाराष्ट्रात सभांना गर्दी जमविणारे नेते अशी त्यांची ओळख होती. सभेला सर्वाधिक गर्दी होते. भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात मोठे करण्याकरीता गोपिनाथ मुंडे आणि प्रमोद महाजनांनी अवघा महाराष्ट्र पिंजुन काढला. नवा विचार, नवे तंत्रज्ञान आत्मसात करण्याची त्यांची तयारी होती. उपेक्षित शोषित वर्गामधे त्यांनी नवा विश्वास निर्माण केला. हे सर्व करत असतांना त्यांना राजकारणात असलेली अनिश्चितता, अपयश, जिवघेणी स्पर्धेला सामोरे जावे लागले. पक्षाच्या पलिकडे जाऊन अनेक संघटना, अनेक गट, माणसे त्यांच्याशी घट्ट जोडल्या गेली होती. गोपीनाथ मुंडे खऱ्या अर्थाने लोकनेते होते. यावेळी डॉ.राजेंद्र पिपाडा व दशरथ तुपे यांनी मुंडे यांच्या प्रतिमेचे पुजन करुन त्यांना अभिवादन केले.
( १२ पिपाडा)