अहमदनगर : मालमत्ता कराची थकबाकी वसुलीसाठी महानगरपालिकेची शास्ती कर योजना संपुष्टात येताच जप्ती कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. या कारवाईअंतर्गत बुरुडगाव प्रभाग कार्यालयाने कारवाई केली. शहरातील सथ्था कॉलनीतील आशिष बिल्डींगच्या दुस-या मजल्याला टाळे ठोकले आहे. तब्बल ४.४४ लाख मालमत्ता कराची थकबाकी असल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.शास्तीमाफीमुळे सात कोटीची वसुलीमहापालिकेच्या दुसऱ्या टप्प्यातील शास्तीमाफीमुळे महापालिकेच्या तिजोरीत सात कोटींची जमा झाली आहे. ११ जून च्या रात्री बारापर्यंत ही थकबाकी जमा झाली आहे. महापालिकेने १२ एप्रिल ते ११ मे या कालावधीसाठी शास्तीमाफीत ७५ टक्के सवलत दिली होती. पहिल्या महिन्याची सवलत, शास्तीमाफी अशा दोन्ही सवलतींचा लाभ घेत तब्बल ३२ कोटीचा भरणा केला होता. १२ मे ते ११ जून या कालावधीत थकबाकी व मालमत्ता कर भरला तर ५० टक्के सवलत देण्यात आली होती. त्याचा लाभ घेत मालमत्ताधारकांनी ७ कोटीची रक्कम महापालिकेत अदा केली. शास्तीमाफीचा सवलत कालावधी संपुष्टात आल्याने आता थकबाकीदारांवर कारवाई करण्याचे संकेत जिल्हाधिकारी राहुली व्दिवेदी यांनी आहेत.
मालमत्ता कर थकबाकीदारांवर महापालिकेची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 2:56 PM