यातील तक्रारदार यांचा महानगरपालिका हद्दीत मृत जनावरांच्या दहिनीचा प्रकल्प आहे. या प्रकल्पासंदर्भात नेरीने (राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था) त्रुटी काढल्या आहेत असे सांगत या त्रुटी दूर करून बिल काढण्यासाठी पैठणकर याने प्रकल्प चालकाकडे पाच लाख रुपये मागितले होते. तडजोडीअंति २ लाख ५० हजार देण्याचे ठरले. याबाबत मात्र संबंधित प्रकल्प चालकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिक येथील पथकाकडे तक्रार केली होती. बुधवारी पैठणकर याने तक्रारदाराला सावेडी येथील कचरा डेपोजवळ पैसे घेऊन बोलाविले होते. दरम्यान, याचवेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने घटनास्थळी सापळा लावला होता. पैठणकर याने तक्रारदाराकडून पैसे स्वीकारताच त्याला पथकाने पंचासमक्ष रंगेहात ताब्यात घेतले. त्यानंतर पथकाने पैठणकर याला घेऊन त्याचे महापालिकेतील कार्यालय व त्याच्या घराचीही तपासणी केली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक सुनील कडासने, अपर पोलीस अधीक्षक नीलेश सोनवणे, उपअधीक्षक विजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक किरण रासकर, मृदुला नाईक, हवालदार माेरे, गोसावी, कुशारे यांच्या पथकाने ही कारवाई केली.