शहरं
Join us  
Trending Stories
1
कागलमध्ये राडा! मुश्रीफ आणि घाटगे समर्थक भिडले; एकमेकांची कॉलर पकडून हाणामारी
2
मनसेकडून पाच नावांची घोषणा, चौथ्या यादीत कोणत्या मतदारसंघात उतरवले उमेदवार?
3
महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? 'या' 12 जागांचा वाद कायम, तिन्ही पक्षांचा दावा...
4
भायखळ्यात यामिनी जाधवांविरोधात ठाकरेंचा शिलेदार ठरला; कोण आहेत मनोज जामसुतकर?
5
"आम्हाला ५ जागा द्या, अन्यथा २५ जागांवर लढणार’’, मित्रपक्षाचा मविआला इशारा 
6
मृत्यू केव्हा गाठणार? एका रिपोर्टवर AI टूल करते भविष्यवाणी; लोकांच्या हॉस्पिटलमध्ये लागल्यात रांगा
7
जबरदस्त! Whatsapp मध्ये येणार कमाल फीचर; मोबाईल न वापरता मॅनेज करू शकता कॉन्टॅक्ट्स
8
Maharashtra Assembly Election: दिंडोशीत सुनील प्रभूंविरोधात शिंदेंच्या शिवसेनेचा उमेदवार कोण?
9
हॉकीच्या 'राणी'ला निरोप! "देशातील प्रत्येक मुलीचा आत्मविश्वास वाढवला", IAS अधिकारी भारावली
10
Maharashtra Assembly election 2024: अंधेरी पूर्वची जागा शिंदेंच्या शिवसेनेला की, भाजपला?
11
"वर्षभर वेळ मागितला, तरी दिला नाही; मातोश्रीवर गेलो तिथे ६ तास थांबवलं अन् २ मिनिटे भेटले"
12
अभिनेता पृथ्वीक प्रतापने साधेपणाने लग्न का केलं? कारण वाचून तुम्हीलाही वाटेल हेवा!
13
भारत-चीन सैन्य मागे घेण्यास सुरुवात; येत्या तीन दिवसांत टेंट, शेड अन् इमारती हटवल्या जाणार
14
पतीसह पिकनिकला गेलेल्या महिलेवर सामूहिक बलात्कार, व्हिडीओही बनवले, गुन्हा नोंदवण्यासाठी पीडितांची वणवण
15
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणातील शूटरला देश सोडण्यासाठी पासपोर्ट देण्याचं दिलेलं आश्वासन
16
आदित्य ठाकरेंकडे ५३५ हिरे लगडलेले कडे, दीड किलो सोने...; प्रतिज्ञापत्रात उद्धव ठाकरेंचेही उत्पन्न केले जाहीर
17
विधानसभा निवडणुकीत महायुतीचा स्ट्राइकरेट कसा असेल? मुख्यमंत्री शिंदे यांनी एका वाक्यात सांगितलं 
18
Maharashtra Assembly Election 2024: दिनकर पाटलांमुळे भाजपला फटका? नाशिकमध्ये समीकरण बदललं!
19
"राहुल गांधींच्या विधानाची मोडतोड करून फेक नरेटिव्ह पसरवण्याचा भाजपाचा प्रयत्न’’, नाना पटोले यांचा आरोप

खून करणारा आरोपी गजाआड; आरोपीला सहा दिवसांची पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2020 12:29 PM

संगमनेर तालुक्यातील कौठेकमळेश्वर येथे पूर्ववैमनस्यातून डोक्यात कुºहाड घालून सतीष छबू यादव  या व्यक्तीचा भरदिवसा खून करण्यात आला. रविवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ही खळबळजनक घटना घडली. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला. त्यानंतर तपासाची चक्रे फिरवीत पोलिसांनी खुनाच्या आरोपावरून गोरख संपत यादव (वय ३९) यास अटक केली. आरोपीस न्यायालयाने सहा दिवसांची पोलीस कोठडी दिली. 

तळेगाव दिघे : संगमनेर तालुक्यातील कौठेकमळेश्वर येथे पूर्ववैमनस्यातून डोक्यात कुºहाड घालून सतीष छबू यादव  या व्यक्तीचा भरदिवसा खून करण्यात आला. रविवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ही खळबळजनक घटना घडली. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला. त्यानंतर तपासाची चक्रे फिरवीत पोलिसांनी खुनाच्या आरोपावरून गोरख संपत यादव (वय ३९) यास अटक केली. आरोपीस न्यायालयाने सहा दिवसांची पोलीस कोठडी दिली.  संगमनेर तालुक्यातील कौठेकमळेश्वर येथील सतीष छबू यादव (वय ३६) यास दुपारच्यावेळी घरातून बोलावून घेत पूर्ववैमनस्यातून मारहाण करण्यात आली. डोक्यात कुºहाड घालत सतीष छबू यादव यास जबर जखमी करण्यात आले. प्रकाश माधव यादव यांच्या यादववस्ती येथील राहत्या घरासमोर ही रविवारी भरदुपारी ही खुनाची घटना घडली. रक्तबंबाळ अवस्थेत सतीश यादव यास उपचारार्थ लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र तत्पूर्वीच सतीष यादव यांचा मृत्यू झाला होता. या खुनाची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडित, पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांनी पोलीस पथकासह कौठेकमळेश्वर येथे धाव घेतली. आरोपीच्या अटकेसाठी पोलीस पथकाला तपासाच्या सूचना दिल्या.  त्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक पप्पू कादरी यांच्या नेतृत्वाखालील हे. कॉ. लक्ष्मण औटी, विष्णू आहेर, राजू खेडकर, पोलीस नाईक आण्णासाहेब दातीर, बाबा खेडकर, यमना जाधव, ओंकार शेंगाळ, लुमा भांगरे यांच्या पथकाने रात्रीच आरोपी गोरख संपत यादव यास कोकणगाव येथे अटक केली. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSangamnerसंगमनेरCrime Newsगुन्हेगारी