पारनेर : पारनेर तालुक्यातील नारायणगव्हाण येथील माजी सरपंच प्रकाश कांडेकर हत्येप्रकरणी शिक्षा भोगत असलेला आणि सध्या पॅरोल रजेवर असणारा माजी सरपंच राजाराम शेळके याची शुक्रवारी दुपारी नारायणगव्हाण येथील शेतात काम करत असताना निघृण हत्या करण्यात आली.
राजाराम शेळके हा शुक्रवारी दुपारी त्यांच्या शेतात काम करत होता. त्यावेळी अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर हल्ला केला. हल्ला झाला त्यावेळी शेळके एकटाच होता. दुपारी एकच्या सुमारास त्यांच्यावर मारेकर्यांनी हल्ला केला. धारदार शस्त्राने त्याच्या गळ्यावर वार करण्यात आले. त्यात त्याच्या मानेला गंभीर जखम झाली. त्याला तातडीने शिरुर येथील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचे निधन झाले.
१३ नोव्हेंबर २०१० मध्ये नारायणगव्हाण सेवा संस्था अध्यक्ष प्रकाश कांडेकर यांची नगर-पुणे महामार्गावर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. ती हत्या तत्कालीन सरपंच राजाराम शेळके याने सुपारी देऊन केली होती. या हत्ये प्रकरणी राजाराम शेळके यास शिक्षा झाली होती. सध्या तो पॅरोल रजेवर होता.