त्यांच्यामागे पत्नी, तीन मुले, मुलगी, सुना व नातवंडे, असा परिवार आहे. भेंडा येथील शासन नोंदणीकृत ठेकेदार बापूसाहेब नवले यांचे ते वडील होत.
.................
शालनबाई तुपे
श्रीगोंदा : श्रीगोंदा येथील औटीवाडीतील शालनबाई बाजीराव तुपे (७५) यांचे वृद्धापकाळाने गुरुवारी रात्री निधन झाले. त्यांच्या मागे ३ मुले, सुना व नातवंडे, असा परिवार आहे. त्या पत्रकार अंकुश तुपे यांच्या मातोश्री होत.
.....................
सुरेश लोंढे
अहमदनगर : विनायकनगर परिसरातील भाजीपाल्याचे व्यापारी सुरेश सखाराम लोंढे यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. ते ५० वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुले, मुलगी व तीन भाऊ, असा परिवार आहे.
.....................
जनाबाई आठरे
अहमदनगर : जनाबाई विलासराव आठरे यांचे शुक्रवारी (दि.७ मे) निधन झाले. त्या ८६ वर्षांच्या होत्या. चंद्रभान आठरे पाटील ग्रामनवोदय ट्रस्टच्या त्या ज्येष्ठ संस्थापक व विश्वस्त होत्या. अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे माजी अध्यक्ष व आठरे पाटील पब्लिक स्कूलचे संस्थापक प्राचार्य दिवगंत विलासराव आठरे पाटील यांच्या त्या पत्नी होत. त्यांच्या पश्चात मुलगा संजय, सून मंजूषाताई, मुलगी डॉ. प्राची विजय पाटील, सुप्रिया अजय शिर्के व नातू ऋषिकेश आठरे, असा परिवार आहे.