शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

'निवडणुकांमध्ये माझी जबाबदारी वाढते, मला प्रचारमंत्र्याचा दर्जा द्या'

By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2018 4:28 PM

अहमदनगर महापालिका निवडणुकांच्या प्रचारार्थ पंकजा मुंडे यांनी नगरमधील विविध प्रभागात जनतेला संबोधित केलं.

अहमदनगर - निवडणुकांमध्ये माझी जबाबदारी वाढते, अधिवेशन चालू होतं तरी मला मध्य प्रदेशला जावं लागतं. आता, उद्या तेलंगणातही मला प्रचारासाठी बोलावलं आहे. तर नगरमध्येही निवडणुका चालू असल्यानं येथेही मी प्रचारासाठीच आले आहे, असे ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडेंनी म्हटलं. तसेच मी सुजितसिंग ठाकूर यांना विनंती करणारंय की मला प्रचारमंत्र्याचा दर्जा द्या, असे पंकजा मुंडे यांनी अहमदनगर महापालिका प्रचारार्थ आयोजित सभेत म्हटले. 

अहमदनगर महापालिका निवडणुकांच्या प्रचारार्थ पंकजा मुंडे यांनी नगरमधील विविध प्रभागात जनतेला संबोधित केलं. त्यावेळी, कायनेटिक चौक येथे विजय संकल्प सभेत बोलताना, सध्या प्रचाराचा झंझावत सुरू असून मध्य प्रदेश, तेलंगणातही मला प्रचाराची जबाबदारी देण्यात आली आहे. तर, अहमदनगर येथेही मी प्रचारासाठीच आली आहे. त्यामुळे आता, मला प्रचारमंत्रीपदाचा दर्जा द्या, अशी विनंती मी आमच्या सुजितसिंग ठाकूरसाहेबांना करते, असे पंकजा मुंडे यांनी म्हटले. सध्या राज्यात कुठल्याही निवडणुका असल्या की पंकजा मुंडे या भाषणाला लागतात. सगळीकडे प्रचारासाठी मला पाठवले जाते. उमेदवारही माझ्या सभांची पक्षाकडे मागणी करतात, असेही मुंडे यांनी म्हटले. केडगावमधील प्रभाग क्र 15, 16, 17 मधील भाजपा उमेदवाराच्या प्रचार शुंभारंभप्रसंगी त्या बोलत होत्या. केडगाव येथील रेणुका मातेची पुजा करुन प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी खासदार दिलीप गांधी, आमदार शिवाजी कर्डिले, अभय आगरकर उपस्थित होत.

यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या, कर्डीले हे दबंग आमदार आहेत. त्यांच्याकडे जादूची कांडी आहे. त्यांनी रात्रीतून काँग्रेसचे उमेदवार फोडले. भाजपमध्ये त्यांचा प्रवेश करून घेतला. हे चमत्कार फक्त कडीर्लेच करू शकतात. महापालिका झाल्यापासून सत्ताधाऱ्यांनी एकही भरीव काम नगरमध्ये केले नाही. मात्र विकास कामात खोडा घालण्याचा प्रयत्न केला. शहरातील उड्डाणपुलाला भाजप सरकारने निधी दिला. पण, महानगरपालिका सत्ताधाऱ्यांनी ना हरकत दाखला देण्यास टाळाटाळ केली. त्यांच्यामुळेच उड्डाणपूल रखडला आहे. शहराचा विकास करायचा असेल भाजपची सत्ता पाहिजे. केंद्रात, राज्यात भाजपची सत्ता आहे, असे प्रतिपादन पंकजा मुंडे यांनी केले.नगर शहरातून  बीड, पुणे, कल्याण, नाशिक , मनमाड, औरंगाबादला या भागातून जावे लागते. शहरातील वाहतूक कोंडीची समस्या दूर व्हावी यासाठी  भाजपने  या भागात उड्डाणपूल  मंजूर केला. पण त्यासाठी मनपा  मंजुरी देण्यास जाणीवपूर्वक दिरंगाई केली. त्यामुळे हा उड्डाणपूल रखडलेला आहे. गेली पंचवीस वषार्पासून नगर शहराचा विकास रखडलेला आहे. केंद्रात व राज्यात भाजपची सत्ता आहे. नगरमध्ये भाजपची सत्ता आली तरच नगर शहराचा हा पूर्णपणे विकास होणार. भाजप विकासाचीच कामे करत नाही तर सामाजिक कामसुध्दा करते. त्यासाठी भाजप हा एकमेव पर्याय आहे.

नाते गोते बाजुला ठेवत केडगाव भाजपमय केलेआमदार कडीर्ले म्हणाले, केडगाव मध्ये पंचवीस वषार्पासून काँग्रेसची सत्ता होती. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगीतले, तुमचे नाते गोते बाजूला ठेवा. नगरमध्ये भाजपची सत्ता आली पाहिजे. म्हणून कॉग्रेस कडून उमेदवारी अर्ज भरलेल्या उमेदवारांना रात्रीतून मानसिकता बदलून भाजपमध्ये प्रवेश करुन घेतला व एबी फॉर्म दिला .

तर, सारसनगर येथील सभेत बोलताना गोपीनाथ मुंडेंच्या आठवणींना उजाळाला दिला. तसेच येथील लोकांचं मुंडेसाहेबांवर आजही तितकच प्रेम असल्याच मुंडेंनी म्हटले. 'भारतीय जनता पार्टीनं जेव्हा सुरुवात केली, तेव्हा जनता पार्टीच्या नांगरधारी शेतकरी या चिन्हावर मुंडेसाहेबांनी जिल्हा परिषदेची निवडणूक झाली होती. तेव्हा 28 वर्षाचा तरुण गोपीनाथ मुंडे जिल्हा परिषदमध्ये निवडूण आला. सन 1980 च्या दशकात मुंडे साहेबांनी पहिली निवडणूक लढवली अन् 1984 मध्ये भाजपाचे प्रदेशाध्यक्ष झाले. त्यानंतर, मुंडेसाहेबांनी महाराष्ट्रातील बहुजनांना एकत्र करण्याच काम केलं. त्यामुळेच येथील लोक आजही कमळ म्हणजे ते मुंडेसाहेबांच का, अशी विचारणा करत असल्याचं पंकजा यांनी सांगितलं.  

टॅग्स :Pankaja Mundeपंकजा मुंडेAhmednagarअहमदनगरBJPभाजपा