अहमदनगर/श्रीगोंदा : लोकमत सखी मंच आणि महानंदा प्लास्टिक आयोजित ‘माझी खास दिवाळी’ हा अनोखा कार्यक्रम नुकताच अहमदनगर आणि श्रीगोंदा येथे पार पडला. या कार्यक्रमास सुहाना मसाले यांचे गिफ्ट प्रायोजक म्हणून सहकार्य लाभले.अहमदनगर येथे लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात पार पडलेल्या या कार्यक्रमात येथील पाककला तज्ज्ञ दीपाली बिहाणी यांनी सखींना दिवाळी निमित्त चकली, शेव, बाखरवडी, शंकरपाळे, रव्याचा चिवडा, चिरोटे असे अनेक पदार्थ प्रात्यक्षिकांसह शिकविले. येथील कार्यक्रमाचे उद्घाटन लोकमतचे संस्थापक संपादक स्वर्गीय जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमापूजनाने झाले. यावेळी व्यासपीठावर महानंदा प्लास्टिकच्या अनिता सोनी, सुहाना मसालेचे विशाल घोडके, अनिल शेटे, डॉ. स्वाती कुलांगे, परीक्षक हर्षल कांबळे, कविता मंत्री, सविता झंवर आदी उपस्थित होते. याशिवाय या अनोख्या आणि नाविण्यपूर्ण कार्यक्रमात सखींसाठी रांगोळी, आकाश कंदील आणि फराळ (गोड-तिखट) या स्पर्धा घेण्यात आल्या. यात सखींनी लक्षवेधी सहभाग नोंदविला.श्रीगोंदा येथे बालाजी मंगल कार्यालयात पार पडलेल्या या कार्यक्रमास सखींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाचे उद्घाटन लोकमतचे संस्थापक स्वर्गीय जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमापूजनाने झाले. यावेळी व्यासपीठावर सुनील शिंदे, जयश्री औटी, गिता चौधरी, शोभा निंबाळकर पूनम फिरोदिया, विद्या गुंदेचा, सुहासिनी गांधी, विजया लंके, संगीता भोंग, शर्मिला देसाई, मानसी देसाई, रूपाली देसाई, सुनीता शिंदे, रोहिणी काकडे, सुवर्णा तरटे आदी उपस्थित होत्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोहिणी काकडे यांनी केले. सर्व विजेत्यांना सुहाना मसालेतर्फे आकर्षक बक्षिसे देण्यात आली. (प्रतिनिधी)
‘माझी खास दिवाळी’ उत्साहात
By admin | Published: October 26, 2016 12:34 AM