शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

नगर फिल्म संस्कृती रुजलीय : रॉस क्लार्कसन, शेमीन नायर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2019 7:41 PM

आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टीवल आॅफ अहमदनगर निमित्ताने नगरमध्ये परदेशी लेखक आणि दिग्दर्शक आले आहे.

आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टीवल आॅफ अहमदनगर निमित्ताने नगरमध्ये परदेशी लेखक आणि दिग्दर्शक आले आहे. यानिमित्ताने हाँगकाँग येथील रॉस क्लार्कसन आणि युनायटेड किग्डम येथील शेमीन भालचंद्र नायर यांच्याशी लोकमत अहमदनगर फेसबुक पेजवर अभिनेत्री साक्षी व्यवहारे यांनी संवाद साधला. अहमदनगरमधील फिल्म कल्चर नक्कीच कौतुकास्पद असल्याची भावना परदेशी पाहुण्यांनी व्यक्त केली.प्रश्न : तुम्ही पहिल्यांदाचा भारतामध्ये आला आहात, तेही अहमदनगरमध्येरॉस : पहिल्यांदाच भारतामध्ये आलोय. खूप चांगला अनुभव आहे. गेल्या दोन दिवसांपासून अहमदनगरमध्ये आहे. आणखी अभ्यास करत आहे. अहमदनगरमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवरील चित्रपट महोत्वस आयोजित केला जातो, हे कौतुकास्पद आहे. जगभरातील चित्रपट या महोत्सवात पाहायला मिळत आहेत. माझा चित्रपट कॅपचर्ड पहिल्यांदाच या महोत्सवामध्ये दाखविण्यात आला.प्रश्न : तुमच्या चित्रपट नेमका कशावर आधारित आहे.रॉस: माझा चित्रपट घरगुती हिंसाचारावर आधारित आहे. स्त्रियांवर होणा-या अत्याचारावर भाष्य केले आहे. स्त्रियांना अत्याचाराविरोधात उभे राहिले पाहिजे. स्त्रियांनी स्वत:चे अस्तित्व शोधून भुतकाळावर मात केली पाहिजे. सिनेमातून सकारात्मक भावना आणि उर्जा स्थापित करण्याचा प्रयत्न केला आहे.प्रश्न : भारतातील आणि जागतिक समस्येबाबत तुमचं मत कायरॉस : भारतातील कायद्याबद्दल मला जास्त माहित नाही. पण कौटुंबिक हिंसाचारातून महिलांची होणारी वाताहत ही जगभर आहे. प्रत्येक देशात सांस्कृतिक भिन्नता असली ती स्त्रियांना अजूनही व्यक्त होता येत नाही. जगभरातील समस्या सारख्याच आहेत.शेमीन भालचंद्र नायरप्रश्न : नगरमधील अनुभव कसा होतानायर - शहर जास्त फिरता आले नाही. पण फेस्टीवलच्या माध्यमातून स्थानिक प्रेक्षकांशी संवाद साधता आला. त्यावरून शहर सांस्कृतिकदृष्ट्या प्रगल्भ असल्याचे जाणवले.प्रश्न : तुमचा चित्रपट टाईड आॅफ लाइजबद्दल थोडसं सांगानायर : आयुष्यात एखाद्या घटनेमुळे आपणामध्ये अपराधीपणाची भावना निर्माण होते. ते दुख आपण व्यक्त करु शकत नाही. त्यामुळे खचत जातो. या अपराधीपणाच्या भावनेतून बाहेर पडण्यासाठी स्वत:चे कर्म उपयोगी पडते. त्यामुळे चांगले कर्म करणा-यांवर हा चित्रपट आहे.प्रश्न : नगरमधील फिल्म कल्चरविषयी काय सांगालनायर : नगरमध्ये फिल्म संस्कृती रुचल्याचे दिसून आले. फिल्म फेस्टीवलचे त्यामध्ये योगदान असल्याचे दिसून येते. आंतररष्ट्रीय फिल्म फेस्टीवलमध्ये स्टुडंट कॅटेगरीमध्ये आमची एक फिल्म असल्यामुळे आम्हाला मोठा आनंद झाला. पूर्ण लांबीच्या चित्रपटासाठी पहिल्यांदाचा स्टुंडट कॅटेगरी ठेवण्यात आली आहे. ही बाब आमच्यासाठी कौतुकास्पद होती. नक्कीच अशा फेस्टीवलमध्ये आम्हाला प्रेरणा मिळेल. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर